विशेष प्रतिनिधी
मुंबई : Election Commission सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपर्यंत घेण्याच्या आदेशाचे पालन करीत जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे मतदान २५ जानेवारीच्या आसपास होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने तारखा निश्चित करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ६ आणि ७ जानेवारीला बैठक बोलावली आहे.Election Commission
जिल्हा परिषद निवडणुकांना आवश्यक असलेली ईव्हीएम निवडणूक आयोगाकडे आहेत. मात्र, महानगरपालिका निवडणुकीत गुंतलेले मनुष्यबळ मोकळे झाल्यानंतर लगेचच जिल्हा परिषद निवडणुकांचे मतदान घेतले जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या बैठकीत जिल्हा परिषदांशी संबंधित अधिकारी आणि पोलिस अधिकारी सहभागी होणार आहेत.Election Commission
ओबीसी आरक्षणाबद्दल देण्यात आलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील केवळ १२ जिल्हा परिषदा, तसेच १२५ पंचायत समित्यांमध्ये मतदान होऊ शकले. मात्र, जेथे ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे तेथे अन्य समाजांना योग्य न्याय मिळत नसल्याने निवडणुका रोखण्याचा निर्णय दिला गेला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा यांचे क्षेत्र एक असल्याने सध्या आचारसंहिता जारी करण्यात आली नव्हती. तथापि, ६ आणि ७ रोजी होणाऱ्या बैठकीत याबाबतची तारीख निश्चित करण्यात येईल.
जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहिता मुदत किती दिवस आहे हे लक्षात घेऊन तारखांची आखणी केली जाईल. २५ जानेवारी ही तारीख सोयीची नसेल, तर २८ जानेवारी रोजी मतदान घ्यावे काय, यावर विचार होऊ शकतो. २८ रोजी बुधवार असल्यामुळे त्या दिवशी मतदान घेणे हे जनतेला सोयीचे ठरेल, असेही मत पुढे आले आहे.
Election Commission calls meeting for Zilla Parishad elections, voting date to be decided
महत्वाच्या बातम्या
- मुंबईसाठी अजित पवारांच्या 36 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
- Mumbai Youth : उन्नाव बलात्कार प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन
- CM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का, सख्खे भाचे आशिष माने राष्ट्रवादी अजित पवार गटात
- महायुतीत खदखद; रवींद्र धंगेकरांची नाराजी उघड, अपक्ष लढण्याच्या तयारीत