विशेष प्रतिनिधी
मुंबई: Nitesh Rane आपण एकत्र आलो नाही तर अमित आणि आदित्य दोघेही बेरोजगार होऊन जातील, या भीतीने हे दोन भाऊ आता एकत्र आले आहेत.अदा टोला आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यातील वाढत्या जवळीकीवर भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी लगावला आहे.Nitesh Rane
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने वरळी येथे बोलताना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची आठवण करून देत राणे यांनी ठाकरे गटावर विखारी टीका केली. “बाळासाहेबांनी कधीच हिंदुत्वाशी तडजोड केली नाही, म्हणूनच मुंबईतील मराठी माणूस दंगलीत वाचला. मात्र, आज पक्षामध्ये कोणाला घेतले जात आहे? बॉम्बस्फोटाचे आरोपी आणि ‘हिरव्या सापांना’ पक्षात स्थान दिले जात आहे. जर आज बाळासाहेब असते, तर अशांचे वाभाडे काढत त्यांना पक्षात स्थान दिले नसते,” अशा शब्दांत नीतेश राणे यांनी समाचार घेतला.Nitesh Rane
मुंबईतील मराठी माणसाच्या प्रश्नावर बोलताना राणे यांनी विचारले की, “तुमच्या सत्तेत मुंबईतील मराठी माणसाचा टक्का का घसरला? जर चुकून यांची पुन्हा सत्ता आली, तर मुंबईत आपली मंदिरेही सुरक्षित राहणार नाहीत.” ही निवडणूक केवळ राजकीय नसून आपल्या अस्तित्वाची लढाई असल्याचे त्यांनी नागरिकांना पटवून दिले. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी जे जे आवश्यक आहे, ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पूर्ण केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
“मुंबईचा महापौर हा मराठी आणि हिंदूच होणार,” असा ठाम विश्वास व्यक्त करत नितेश राणे यांनी ठाकरेंना थेट आव्हान दिले. “माझी इच्छा आहे की एकदा आमने-सामने व्हायला हवे, मग बघू आवाज कुठून निघतो,” अशा शब्दांत त्यांनी थेट चॅलेंज दिले. तसेच, महायुतीचा उमेदवार निवडून आल्यावर आपण स्वतः विजयाची मिरवणूक काढू आणि फटाक्यांची एक माळ ‘कलानगर’मध्ये (ठाकरे निवासस्थान) जाऊन लावू, असा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, नितेश राणे यांनी वसई विरार येथील सभेत बोलताना देखील मोठे विधान केले. उत्तर भारतीयांना सुरक्षा हवी असेल तर त्यांनी भाजपा आणि शिंदेसेनेला मतदान करावे असं आवाहन करत त्यांनी उद्धवसेना-मनसेलाही थेट धमकी दिली आहे. वसई विरारमध्ये राहणाऱ्या उत्तर भारतीय आणि हिंदी भाषिकांना सुरक्षा हवी असेल तर त्यांना भाजपा आणि शिंदेसेनेशिवाय पर्याय नाही. कोणीही तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहिले तर त्याला जागा दाखवण्याचं काम आमच्या खांद्यावर तुम्ही टाका हा विश्वास मी तुम्हाला देतो. इतर जे पक्ष आहेत ते केवळ राजकारण करायला येतील परंतु उद्धवसेना असेल, राज ठाकरेंच्या मनसेचे लोक तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहतात तेव्हा तुम्हाला कुणी वाचवायला येत नाही. तुमच्यासाठी जर कुणी उभा असेल, तुम्हाला ताकद देत असेल तर ते फक्त भाजपा आणि शिंदेसेनेचे लोक आहेत असं त्यांनी सांगितले.
Fear of Losing Power Brings Thackeray Brothers Together, Nitesh Rane Jibes
महत्वाच्या बातम्या
- मुंबईत भाजपकडून २६ जणांचे सहा वर्षांसाठी निलंबन
- मांजरी-केशवनगर परिसरामध्ये शिवसेनेकडून १०० कोटींची कामे
- Lahu Balwadkar : बालेवाडीतील गोल्डन ट्रेलीज सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिकांचा लहू बालवडकरांना जाहीर पाठिंबा
- प्रभाग २४ मध्ये बिडकरांचा सक्रिय प्रचार; मॉर्निंग वॉकमध्ये ज्येष्ठ-महिला-खेळाडूंना दिली विकासाची हमी