विशेष प्रतिनिधी
मुंबई : Jayant Patil साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली होती, त्याचा राग आजही काहींच्या मनात जिवंत आहे, हे विसरू नका. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव पुन्हा एकदा सुरू झाला असून मराठी माणसाने सावध राहण्याची गरज असल्याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी केले.Jayant Patil
भाजप नेते अण्णामलाई यांच्या मुंबईतील विधानाचा संदर्भ देत जयंत पाटील यांनी गंभीर इशारा दिला. “अण्णामलाई इथे येऊन काय बोलले? त्यांची भूमिका मुंबई महाराष्ट्राची नाही अशीच दिसते. यावरून मुंबई पुन्हा एकदा तोडण्याचा डाव आखला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या इतिहासाचा राग मनात धरून काही लोक मुंबईवर घाला घालत आहेत. अशा वेळी आपण सर्वांनी एकत्रितपणे सावध होऊन या संकटाचा सामना केला पाहिजे,” असे आवाहन पाटील यांनी केले.Jayant Patil
आदित्य ठाकरे यांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना जयंत पाटील म्हणाले, “उद्धवजी, तुम्ही सभेला उशिरा आलात, पण त्याआधी मी आदित्य ठाकरेंचे अत्यंत आक्रमक आणि मुद्देसूद भाषण ऐकले. मुंबईची नस, मुंबईला काय हवे आहे आणि मुंबईच्या समस्या काय आहेत, याची ओळ न् ओळ आदित्यला ठाऊक आहे. त्यामुळे आता तुम्ही मुंबईची संपूर्ण जबाबदारी आदित्य ठाकरेंकडे सोपवा आणि तुम्ही स्वतः पूर्ण महाराष्ट्राकडे लक्ष द्या.” आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांनी मुंबईच्या भविष्याची सूत्रे त्यांच्याकडे देण्याचा सल्ला दिला.
Bid to Split Mumbai from Maharashtra Revives, Alleges Jayant Patil
महत्वाच्या बातम्या
- Fadnavis : राज ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर, ठाकरे बंधूंवर निशाणा
- लाडक्या बहिणींना पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; महायुतीचा जाहीरनामा जाहीर
- मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन
- शब्द शिवसेनेचा’ जाहीरनाम्याच्या माध्यमातून कायापालट करणार