विशेष प्रतिनिधी
ठाणे: Imtiaz Jaleel मुंब्रा येथील नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख हिच्या बचावासाठी एआयएमआयचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील मैदानात उतरले आहेत. सहरने केलेल्या विधानाला मी पाठिंबा देतो असे म्हणत येणाऱ्या काळात आम्ही संपुर्ण राज्यात हिरवा रंग करणार आहोत. किरीट सोमय्यांना मी थेट आव्हान देतो. भाजपाची सत्ता आहे काही करू असे वाटत असेल तर, सोमय्या पुन्हा मुंब्र्यात आले तर त्यांचे व्हिडीओ चौकात दाखवेन.” असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला.Imtiaz Jaleel
गेल्या काही दिवसांपासून मुंब्रामधील AIMIM च्या नगरसेविका सहर शेख यांनी केलेल्या विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यांच्या संपूर्ण मुंब्रा हिरवा करणार, या विधानाने एकच खळबळ उडाली होती. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्या या विधानावर टीका करत पोलिसांकडे तक्रारदेखील दाखल केली होती. या सर्व प्रकरणांनंतर इम्तियाज जलील यांनी नगरसेविका सहर शेख यांची भेट घेतली.Imtiaz Jaleel
इम्तियाज जलील हे भगवी मफलर घालून पत्रकार परिषदेला आले होते. ते म्हणाले की, “या देशाला रंगामध्ये वाटले गेले आहे. हा रंग कोणत्या विशेष जातीचा नाही, पण रंग जातीला जोडले जातात. कारण त्यांची मानसिकता काय? हे लक्षात येते.” असे म्हणत टीका केली. भाजपचे नेते नितेश राणेंचा एक व्हिडीओ त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवला. “नितेश राणे बोलले मशिदीमध्ये घुसून मारु, तेव्हा नितेश राणे यांना नोटीस दिली आहे का? यांच्यासाठी कायदा वेगळा आहे का? फक्त किरीट सोमय्या येतात आणि आमच्या सहर शेखला नोटीस दिली जाते. मी आलो तर मोठ्या संख्येने लोकं पोलीस स्टेशनमध्ये येतील. सहरच्या विधानावर एवढं रान पेटवले गेले. कोणत्या आधारे सहर शेखला नोटीस पाठवली? भाजपचे पिल्ले जे बोलतात त्यावर काही कारवाई नाही. पोलीस काय करत आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.Imtiaz Jaleel
“मुंबई आणि महाराष्ट्रासह आम्ही 125 जागा जिंकून मोठी भरारी घेतली आहे. पक्षाबाबत बोलले जाते आम्ही जातीवादी आहे. आम्हाला संविधानाने अधिकार दिला आहे. ओवेसीपेक्षा मोठा नेता या देशात नाही. संविधान वाचवले पाहिजे ते वारंवार बोलतात. भाजप सत्तेत आल्यापासून हिंदू राष्ट्र करायचे बोलतात. फक्त सत्तेसाठी ते हे करत आहेत, त्यांची आम्ही निंदा करतो. भाजप शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गटाची मी निंदा करतो,” अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली.
आमच्यावर खुप मोठी जबाबदारी आली आहे. पक्षाला कसे मोठे करता येईल. AIMIM हिरवा रंगाचे आहे असे सर्व बोलतात, पण AIMIM चा हिंदू बांधव विजय उबाळे यांना मुस्लिम भागातून निवडून आणले. सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेवून आम्हाला पुढे जायचे आहे. आम्ही मागासवर्गीय समाजामधील अनेकांना निवडून आणले आहे. मुंब्र्यात हिरवा-भगवा सुरू आहे. पण हे कोण बघत नाही की, हिंदू मयुर सारंग याला आम्ही निवडून आणलं. 125मध्ये अनेक जण हिंदू आहेत जे AIMIM च्या तिकिटावर निवडून आले आहेत. पराभव झाला त्यांचा त्यामुळे ते चिंतेत आहेत,” असे म्हणत त्यांनी टीका केली.
“We Will Turn the Entire State Green,” Imtiaz Jaleel Warns Kirit Somaiya
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन प्रकरणात छगन भुजबळ निर्दोष; ईडी मनी लॉन्डरिंग केसला पूर्णविराम
- गुजरातच्या दारूबंदीच्या धर्तीवर गुटखा बंदीसाठी स्वतंत्र कायदा, नरहरी झिरवाळ यांची माहिती
- उध्दव ठाकरे यांच्या शिवसैनिकाला महापाैरपदासाठी पाठिंबा द्या, भास्कर जाधव यांचे एकनाथ शिंदे यांना आवाहन
- महापालिकांमध्ये महापौर-उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर ; महिनाअखेरीस सत्तास्थापना