विशेष प्रतिनिधी
बारामती: Sharad Pawar पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनावरून सुरू केलेल्या राजकारणाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्वतः माध्यमांसमोर येऊन चपराक लगावली.Sharad Pawar
अजित पवारांच्या मृत्यूमुळे आम्हाला सगळ्यांना यातना झाल्या आहेत. यामागे कोणतंही राजकारण नसून हा निव्वळ अपघात आहे. त्यामुळे या प्रकरणात राजकारण आणू नये असं आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलं. काही गोष्टी आपल्या हातात नसतात, जे काही नुकसान झालंय ते भरून निघणार नाही असंही ते म्हणाले. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची न्यायालयाच्या देखरेखेखाली चौकशी करावी अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली होतीSharad Pawar
देशात कुणीही सुरक्षित नाही, अजित पवारांच्या अपघातामागे काहीतरी घातपात असू शकतो असा संशय ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला. कोणत्याही केंद्रीय तपास यंत्रणेवर आपला विश्वास नाही. त्यामुळे या प्रकरणाची योग्य चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली करावी अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली. त्यावर यामध्ये राजकारण करू नका असं शरद पवारांनी म्हटलं. यावेळी शरद पवारांच्या डोळ्यात अश्रू आल्याचं दिसून आलं.Sharad Pawar
शरद पवार म्हणाले की, “अजित पवार यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्रासाठी प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला. जे काही नुकसान झालंय ते भरून निघणारं नाही.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशय व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी केली आहे. यामागे काही घातपात आहे का याता तपास केला पाहिजे असंही त्या म्हणाल्या. या आधी झालेल्या दोन अपघातांमध्ये पायलटला दोष देण्यात आला, हा सर्वात सोपा मार्ग आहे. पण या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे.
जर एखाद्या वरिष्ठ राजकीय नेत्यासोबत अशी घटना घडू शकते, तर ती आपल्या व्यवस्थेच्या सुरक्षेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करते. अजित पवार हे एनडीएमध्ये असताना पुन्हा एकदा शरद पवारांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होते. अशा परिस्थितीत हा अपघात झाला. देशात सध्या कुणीही सुरक्षित नाही. या अपघातामागे काही घातपात असू शकतो असा संशय त्यांनी व्यक्त केला.
मला कोणत्याही केंद्रीय तपास यंत्रणेवर विश्वास नाही, त्या पूर्णपणे सरकारच्या हातातील बाहुले आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या अपघाताचा तपास हा सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली झाला पाहिजे.
Sharad Pawar’s Public Appearance Delivers a Slap to Mamata’s Politics
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar Exit : “हा” निव्वळ विमान अपघात, राजकारण नको; संशयाचे मळभ भरलेल्या वातावरणात पवारांचे वक्तव्य
- अजितदादा म्हणे, भाजपची साथ सोडणार होते; ममता बॅनर्जींची संशय पेरणी किती खरी??, किती खोटी??
- “बघतो”, “सांगतो”, हे शब्द अजितदादांच्या डिक्शनरीत नव्हतेच, ते बोलायला रोखठोक आणि मनाने निर्मळ होते!!
- Uma Bharti : उमा भारती म्हणाल्या- शंकराचार्यांकडून पुरावे मागून प्रशासनाने मर्यादा ओलांडली