दोन महिन्यांपूर्वीच टळला होता अपघात, पिंकी माळीने विमानातील तांत्रिक त्रुटींबाबत व्यक्त केली हाेती चिंता

विशेष प्रतिनिधी

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जे विमान अपघातग्रस्त झाले त्याच विमानातील तांत्रिक त्रुटींबाबत फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हिने चिंता व्यक्त केली हाेती असे समाेर आले आहे. पिंकीचा भाऊ करण याने कंपनीच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. Pinky Mali

दोन महिन्यांपूर्वीच अशाच एका उड्डाणादरम्यान मोठा अपघात टळला होता. त्या वेळी पिंकीने वैमानिकांचा अननुभवीपणा आणि विमानातील तांत्रिक त्रुटींबाबत कुटुंबाकडे चिंता व्यक्त केली होती. खुद्द अजित पवार यांनीही त्या वेळच्या सेवेबद्दल नाराजी वर्तवली होती, अशी माहिती समोर येत आहे. व्हीएसआर कंपनीच्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचा समावेश आहे.

पिंकी केवळ आपल्या करिअरचा विचार करत नव्हती. मंगळवारी रात्री भावाशी बोलताना तिने झोपडपट्टीतील गरीब आणि शोषित मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची इच्छा व्यक्त केली होती. “मी आता कमावती झाले आहे, मला या मुलांसाठी काहीतरी करायचे आहे,” हे तिचे शब्द आता केवळ आठवणीत उरले आहेत.

पिंकीचे वडील शिवकुमार यांनी जड अंतःकरणाने मंगळवारच्या आठवणींना उजाळा दिला. “ती म्हणाली होती, मी नांदेडला जातेय. सकाळी बातम्या पाहिल्या आणि काळजाचा ठोका चुकला. माझ्या मुलीला मॉडेलिंगची आवड होती, पण मीच तिला एअर होस्टेस होण्याचा आग्रह केला.’

Pinky Mali expressed concern about the technical glitches in the plane

महत्वाच्या बातम्या