उपमुख्यमंत्री अजित पवार पंचत्वात विलिन, बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

विशेष प्रतिनिधी

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शोकाकुल वातावरणात आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्राच्या राजकारणातील एका झंझावाती पर्वाचा आज अखेर अंत झाला. त्यांचे सुपुत्र पार्थ आणि जय पवार यांनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला, तेव्हा उपस्थित असलेल्या हजारो समर्थकांचे आणि कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले होते. बारा वाजून बारा मिनिटांनी अजित पवार पंचत्वात विलिन झाले. Ajit Pawar



अजितदादांना निरोप देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन, यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित होते. अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी लाखाे लोक दाखल झाले. तत्पूर्वी, अजित पवार यांचे पार्थिव बारामती येथील त्यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी आणण्यात आले हाेते. तेथून विद्या प्रतिनष्ठानच्या प्रांगणात अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले.

बारामती येथे बुधवारी सकाळी 8.46 वाजता झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार (66 वर्षे 6 महिने 6 दिवस) यांचे निधन झाले. त्यांच्यासोबत वैमानिक सुमीत कपूर, सहवैमानिक शांभवी पाठक, अंगरक्षक विदीप जाधव आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी यादव होते. त्यातील एकही जण वाचू शकला नाही.

Deputy Chief Minister Ajit Pawar laid to rest with full state honours in Baramati

महत्वाच्या बातम्या