विशेष प्रतिनिधी
मुंबई: CM Devendra Fadnavis प्रसंग कठीण होता…पण, ज्या धीरोदात्तपणे श्रीमती सुनेत्रावहिनींनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला, तो कौतुकास्पद, धाडसी आणि त्यांची प्रतिबद्धता अधोरेखित करणारा आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे कौतुक केले.CM Devendra Fadnavis
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज राज्याच्या ११ व्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यासोबतच महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेने उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली आहे. मुंबईतील लोकभवन येथे अत्यंत साध्या आणि भावूक वातावरणात हा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाद्वारे आपली पहिली प्रतिक्रिया देत, सुनेत्रा पवार यांच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. तसेच त्या अजित पवारांचा वारसा समर्थपणे चालवतील, असा विश्वास व्यक्त केला.CM Devendra Fadnavis
फडणवीस म्हणाले, शुभेच्छा देण्याचा हा प्रसंग नाही… पण, अजितदादांचा वारसा त्या समर्थपणे चालवतील, हा मला विश्वास आहे. राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या, त्यांची ही कारकिर्द यशस्वी ठरेल. भाजपा आणि महायुती सरकार म्हणून या कठीण प्रसंगी, आम्ही अजितदादा पवार यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहोत.
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल श्रीमती सुनेत्रा पवार जी यांचे हार्दिक अभिनंदन. अजित पवारजी आयुष्यभर शेतकऱ्यांचे कल्याण, महिला सक्षमीकरण आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी समर्पित होते. मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही त्यांचे कार्य पुढे घेऊन जाणार आणि महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती द्याल”, अशा शब्दांत अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या.
Sunetra Took A Decision In Maharashtra’s Interest, Says CM Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- अजितदादांनी झारीतले शुक्राचार्य ओळखले होते:सुषमा अंधारेंचा सुनेत्रा पवारांना पत्र लिहून सावध राहण्याचा सल्ला
- Sunetra Pawar राज्याला सुनेत्रा पवार यांच्या रूपात मिळाल्या पहिल्या उपमुख्यमंत्री
- निवडणूक पथकाकडून मावळमध्ये साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त
- कार्यकर्ते सैरावैरा होऊ नयेत म्हणून निर्णय, सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत भूमिका