विशेष प्रतिनिधी
मुंबई : गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सर्व कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता, नेत्यांनी सुनेत्रा पवारांना हा जबाबदारी हाताळण्यासाठी तयार केले आणि त्यानंतरच त्यांना निर्णयाची माहिती दिली, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल पाटील यांनी सांगितले. Sunetra Pawar
अनिल पाटील म्हणाले की, शासकीय दुखवटा पूर्ण झाल्यामुळे नेता निवडणे ही वेळेची गरज होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. कुणाला कोणते खाते द्यायचे, हा निर्णय मुख्यमंत्री घेतात, आणि तो निर्णय युतीतील सर्व पक्षांनी मान्य करावा लागतो; अर्थ खात्यासंदर्भात अजून काही चर्चा झालेली नाही. नेता निवडीची प्रक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या माध्यमातून आज दुपारी पार पडेल, त्यानंतर मुख्यमंत्र्यांना माहिती दिली जाईल. Sunetra Pawar
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत दुसऱ्या पक्षांनी काय बोलावे, हे त्यांचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. मात्र, काही दु:खद घटना घडल्याने पक्षाचे कार्यकर्ते सैरावैरा झाले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अजित पवारांनी दिलेल्या उमेदवारीसाठी बारामतीत प्रचार करत असताना कार्यकर्ते दिशाहीन झाले, त्यामुळे त्यांचे व्यवस्थापन करणे गरजेचे होते.
अनिल पाटील म्हणाले की, शरद पवारांनी केलेले वक्तव्य खरेही असू शकते, परंतु त्यांना सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत माहिती आहे की नाही, हे स्पष्ट नाही. नेता निवडीची प्रक्रिया फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांद्वारेच पार पडते, त्यामुळे दुसऱ्या पक्षांचे आमदार यामध्ये सहभागी होणे काही प्रक्रियेचा भाग नाही. Sunetra Pawar
अनिल पाटील म्हणाले की, अजित पवार आणि शरद पवार गटातील नेत्यांमध्ये चर्चा झाली असली तरी ठोस निर्णय अजून झाला नाही. जर अजित पवार याबाबत विचार करत होते, तरी ते पक्षाच्या मंचावर मांडलेले नाहीत. मात्र, त्यांच्या कृती व बॉडी लँग्वेजमधून तसे संकेत मिळाले होते, तसेच स्थानिक निवडणुकीदरम्यान त्यांनी तशा सूचनाही दिल्या होत्या. म्हणूनच, हा निर्णय मजबुरीने घ्यावा लागला आणि कार्यकर्त्यांच्या सैरभैर होण्यापासून थांबवण्यासाठी आणि परिस्थिती हाताळण्यासाठी नेत्यांनी पाऊले उचलली आहेत.
Decision taken to avoid divisiveness among activists, NCP stance on the post of Deputy Chief Minister
महत्वाच्या बातम्या
- Supreme Court : यूजीसीच्या वादग्रस्त नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
- दादा, तुम्ही आमच्यात नाहीत हे मन मान्यच करायला तयार नाही, प्रताप सरनाईक यांचे हृदयस्पर्शी पत्र
- सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्याची नरहरी झिरवळ मागणी
- दारू आणि नियमभंग, अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमागे वैमानिकाचा धक्कादायक भूतकाळ