Mira Nair : न्यूयॉर्कच्या महापौर ममदानींच्या मातोश्री मीरा नायर यांचे नाव ‘एपस्टीन फाइल्स’मध्ये, नव्या दस्तावेजातून उल्लेख समोर

विशेष प्रतिनिधी

न्यूयॉर्क : Mira Nair अमेरिकेतील कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी संबंधित ‘एपस्टीन फाइल्स’मधील नवे दस्तावेज अमेरिकेच्या न्याय विभागाने जाहीर केल्यानंतर खळबळ उडाली आहे. या नव्या कागदपत्रांमध्ये न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांच्या मातोश्री तसेच प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर यांचे नाव पुढे आले आहे.Mira Nair

न्याय विभागाने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या अतिरिक्त कागदपत्रांमध्ये २००९ सालातील एक ई-मेल आढळून आला आहे. हा ई-मेल एपस्टीनच्या चौकशीशी संबंधित फाइल्सचा भाग असून, पब्लिसिस्ट पेगी सीगल यांनी २१ ऑक्टोबर २००९ रोजी एपस्टीनला पाठवला होता. या ई-मेलमध्ये एपस्टीनची साथीदार आणि दोषी ठरलेली लैंगिक तस्कर गिसलेन मॅक्सवेल हिने आयोजित केलेल्या एका ‘आफ्टर पार्टी’चा उल्लेख आहे.Mira Nair



ही पार्टी मीरा नायर दिग्दर्शित ‘अमेलिया’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगनंतर न्यूयॉर्कमधील एका टाऊनहाऊसमध्ये आयोजित करण्यात आली होती. या ई-मेलमध्ये माजी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, उद्योगपती जेफ बेझोस, दिग्दर्शिका मीरा नायर आणि जीन पिगोजी हे उपस्थित असल्याचा उल्लेख आहे. ‘अमेलिया’ हा चित्रपट प्रसिद्ध पायलट अमेलिया एअरहार्ट यांच्या जीवनावर आधारित असून, १९३७ मध्ये त्या पॅसिफिक महासागरात बेपत्ता झाल्या होत्या.

अमेरिकेच्या डेप्युटी अॅटर्नी जनरल टॉड ब्लांच यांनी सांगितले की, ‘एपस्टीन फाइल्स ट्रान्सपरेन्सी अॅक्ट’ अंतर्गत तब्बल ३० लाखांहून अधिक अतिरिक्त पाने सार्वजनिक करण्यात आली आहेत. हा कायदा तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १९ नोव्हेंबर २०२५ रोजी मंजूर केला होता. या नव्या प्रकाशनात २,००० हून अधिक व्हिडीओ आणि सुमारे १.८ लाख छायाचित्रांचा समावेश आहे.

आतापर्यंत एकूण ५२ लाख कागदपत्रे प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यांचे पुनरावलोकन सुरू आहे. नव्याने जाहीर झालेल्या या फाइल्समुळे एपस्टीन प्रकरणाशी संबंधित अनेक नवी नावे आणि दुवे पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

New York Mayor Mamdani’s Mother Mira Nair Named in Epstein Files, Mentioned in Newly Released Documents

महत्वाच्या बातम्या