उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रितीसंगमावर केले स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

विशेष प्रतिनिधी

सातारा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज कराड येथील प्रितीसंगमावर महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. Sunetra Ajit Pawar

यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, खासदार नितीन पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. Sunetra Ajit Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच कराड येथे येऊन स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांचे आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाचे नातेही अत्यंत जिव्हाळ्याचे होते. ते वारंवार कराड येथे येऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण त्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन करत होते. त्यांची आठवण यावेळी उपस्थितांना झाली.



यशवंतराव चव्हाण यांचे विचार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय जीवनाचे केंद्रबिंदू राहिले आहेत. आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर, मोठा राजकीय निर्णय घेण्यापूर्वी किंवा एखाद्या निर्णयाबाबत खेद व्यक्त करण्यासाठी अजित पवार हे नेहमीच प्रीतिसंगमावर नतमस्तक होत आले आहेत. Sunetra Ajit Pawar

त्याच परंपरेचे अनुकरण करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या पहिल्याच दौऱ्यात यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना अभिवादन करून सामाजिक व राजकीय मूल्यांप्रती आपली निष्ठा अधोरेखित केली. त्यांच्या या दौऱ्याला कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Deputy CM Sunetra Ajit Pawar Pays Tribute to Late Yashwantrao Chavan at Preeti Sangam