Police Thane : पोलीस स्टेशन नको, पोलीस ठाणे हवे : मराठी एकीकरण समितीची पोलीस महासंचालकांकडे मागणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Police Thane राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे फलक हे पोलीस स्टेशन ऐवजी पोलीस ठाणे असे करावेत, ऑनलाइन तक्रारदारांच्या हजेरीची सक्ती थांबवावी, परराज्यातील कामगारांची नोंदणी करावी, पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांसाठी निवाऱ्याची सोय करावी आदी मागण्या मराठी एकीकरण समितीने राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्याकडे केल्या आहेत.Police Thane

अनेक ठिकाणी पोलीस ठाण्याच्या पत्रव्यवहारात ‘

पोलीस स्टेशन हा शब्द वापरला जातो. त्याऐवजी पोलीस ठाणे असा शब्दप्रयोग वापरण्याबाबत सक्ती करण्याची मागणी अनेकदा केली होती. मात्र, समितीच्या पाठपुराव्यानंतरही पोलीस स्टेशन शब्दाचा वापर सुरूच असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी समितीचे अध्यक्ष गोवर्धन सखाराम देशमुख यांच्यासह शिष्टमंडळाने समितीच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन दिले. दुसऱ्या मागणीत ऑनलाइन तक्रारदारांच्या हजेरीची सक्ती थांबवण्याबाबतची मागणी करण्यात आली.Police Thane



डिजिटल तक्रारीनंतर पोलीस ठाण्यात हजेरीची सक्ती थांबवण्याची मागणी करून आपले सरकार या पोर्टलवरील तक्रारदारांच्या समस्या मांडण्यात आल्या. पोर्टलवर ऑनलाइन तक्रार केल्यानंतरही नागरिकांना समजपत्र देऊन पोलीस ठाण्यात बोलावले जाते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. समजपत्रा ऐवजी माहितीपत्र असा सन्मानजनक शब्द वापरावा आणि किरकोळ तक्रारींसाठी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधावा, अशीही मागणी केली.

Say ‘Police Thane’, Not ‘Police Station’: Marathi Ekikaran Samiti Urges DGP to Adopt Marathi Terminology

महत्वाच्या बातम्या