विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Thackeray हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून जातो. हिमालय चालू आहे, डोक्यावर बर्फ आहेच. थंड डोक्याने सह्याद्रीचा वापर करून घेतो आणि नंतर सोडून देतो, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली खदखद व्यक्त केली.Uddhav Thackeray
स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा दिवसाच्या कार्यक्रमानिमित्त शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. ते म्हणाले, मराठीसाठी आम्ही दोघे भाऊ एकत्र आलो. आता मुख्यमंत्री त्याचे क्रेडिट घेत आहेत. माझ्यामुळे दोन भाऊ एकत्र आले. असे सांगताना उद्धव ठाकरे मला एका गोष्टीचे समाधान आहे आणि अभिमान आहे की मी मुख्यमंत्री असताना राज्यात मराठी भाषा सक्तीची केली. काल सुद्धा पुन्हा त्यांची सवय काय आहे की जुने दळण दळत बसायचे. इतके दळायचे की लोकांना ते खरे वाटायला लागते.Uddhav Thackeray
महाराष्ट्र आणि बंगालला रंगभूमीची परंपरा आहे. इकडे दादरच्या चौपाटीला मी रंगभूमीची माहिती सांगणारे दालन उभे करणार होतो. रद्द करून टाकले आणि बिल्डरचे घशात टाकले. भाजपचे ऑफिस उभे राहत आहे, तेही भूखंड ढापून. पण माझ्या मातृभाषेचे भवन उभे करायला मुहूर्त शोधायला लागतोय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. कसले तुम्ही मुख्यमंत्री? कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री? एक नक्की आहे की महाराष्ट्राला एका प्रादेशिक पक्षाची गरज आहे आणि शिवसेना आहेच. मराठी माणसाची एक वृत्ती आहे की तो स्वार्थ कधी बघत नाही. हा गुण आहे की दोष आहे, हे कळत नाही.
उद्धव ठाकरे म्हणाले, आज गरज आहे. जसे बंगालमध्ये ममता उभ्या आहेत आणि दिल्लीची नजर सुद्धा होत नाही त्यांच्याकडे पाहण्याची. आम्हाला भाषेचा अभिमान आहेच, पण देशाचा अभिमान जास्त आहे. भाषावार प्रांतरचना झाली, आम्हाला महाराष्ट्र मिळाला, त्याला राजधानी मिळाली. पण इथे येऊन आमच्या घरावर मालकी सांगायला लागले तर कसे सहन करणार?
उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना आजपर्यंत समाजसेवा करत आली आहे. कारण शिवसेना प्रमुखांनीच सांगितले होते 80 टक्के समाजसेवा आणि 20 टक्के राजकारण. अपघात, घातपात झाला तर अॅम्ब्युलन्स घेऊन मदतीला धावून जाणारा शिवसैनिक असतो. हे लोक आम्हाला येऊन हनुमान चालिसा शिकवता. का? मारुती स्तोत्र नाहीये? हनुमान चालिसाही म्हणा पण मारुती स्तोत्र आपल्याकडे आधीपासून आहे. आजकाल काही लोक भगवद्गीता सांगायला लागले आहेत. आपल्याकडे भगवद्गीतेचा अर्थ लहान वयातच संत ज्ञानेश्वरांनी सांगून ठेवला आहे. आजही अनेकांना त्याचा अर्थ समजत नसेल. मनाचे श्लोक आहेत. ते रोज वाचले तर कोणी भाजपमध्ये जाणारच नाही. कारण जगायचे कसे हे त्यात सांगितले आहे.
Sahyadri Stands by the Himalayas, But the Himalayas Uses and Abandons Us,” Says Uddhav Thackeray in Sharp Remark
महत्वाच्या बातम्या
- Sunetra Pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार
- Manoj Jarange : माझ्या विराेधात स्टिंग ऑपरेशनचा कट, महिलेचाही सहभाग : मनाेज जरांगे यांचा दावा
- व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यास बारामती पाेलीसांचा नकार, दबाव असल्याचा राेहित पवार यांचा आराेप
- बारामती पोलीस ठाण्यात ‘ब्लॅक बॉक्स’, अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला नवे वळण