विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर या संपूर्ण प्रकरणाभोवती संशयाचे वातावरण निर्माण झाले असताना या प्रकरणाचा तपास अधिक सखोलपणे व्हावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांनी केली आहे. Ajit Pawar
अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामतीकडे जात असताना विमान कोसळून त्यांचा मृत्यू झाला. आमदार रोहित पवार यांनी यापूर्वी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या अपघातामागे घातपात असण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यांनी व्हीएसआर कंपनी आणि नागरी उड्डाण संचलनालय यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. विमान दुर्घटनेत काही संशयास्पद बाबी असल्याचे त्यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आणि या सर्व मुद्द्यांवर चर्चा केली.
मुंबईतील देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वीसहून अधिक आमदार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी एकत्र आले होते. या बैठकीत अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत सादर करण्यात आलेल्या अहवालावर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. नागरी उड्डाण संचलनालय म्हणजेच डीजीसीएने सादर केलेल्या अहवालाबाबत अनेक शंका उपस्थित होत असल्याचे आमदारांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणाचा अधिक सखोल तपास व्हावा, अशी भावना आमदारांमध्ये व्यक्त झाली.
काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी या दुर्घटनेचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून म्हणजेच सीबीआयमार्फत करण्यात यावा, अशी मागणी केली होती. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही दिले होते. या मागणीबाबत पुढे काय झाले, याबाबत मुख्यमंत्र्यांकडे विचारणा करावी, असे आमदारांनी बैठकीत सुचवले. त्यावर सुनेत्रा पवार यांनी लवकरच सर्वजण मिळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा करू, असे आश्वासन दिल्याचे सांगितले जात आहे.
MLAs Also Raise Doubts Over Ajit Pawar Plane Crash; Demand Detailed Probe
महत्वाच्या बातम्या
- Raju Shetti : आंबा व काजू उत्पादकांना मदत द्या अन्यथा धडक मोर्चा, राजू शेट्टी यांचा इशारा
- Shri Rasiklal Dhariwal : श्री रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ९वे वार्षिक रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
- Brought back citizens : दुबई येथून १११ नागरिक पुण्यात सुखरूप पोहोचले; उर्वरित नागरिकांना आणण्याची कार्यवाही सुरु
- Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या मदतीने पुणेकर पर्यटक मायदेशी परतले! एकनाथ शिंदेचे मानले आभार…