baba khan : सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर बाबा खानच्या घराबाहेर फायरिंग

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर नदीम मोइनुद्दीन खान उर्फ बाबा खान यांच्या घराबाहेर शनिवारी पहाटे गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या कारवर तसेच हवेत गोळ्या झाडल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. baba khan

मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा-कौसा भागात राहणाऱ्या बाबा खान (वय 45) यांच्या घराबाहेर आज पहाटे सुमारे 4.45 वाजण्याच्या सुमारास हल्लेखोर आले आणि त्यांनी गोळीबार केला. या घटनेत एकूण तीन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी एक गोळी घराबाहेर उभ्या असलेल्या वाहनावर लागली, तर उर्वरित दोन गोळ्या हवेत झाडण्यात आल्या. या प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आणि नागरिक घाबरून घराबाहेर आले. baba khan



घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांवरही गोळीबार केला. या गोळीबारात दोन जण जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या काळसेकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत शहाबाद उर्फ शंभू मुन्ना शमशाद कुरेशी (वय 28) या आरोपीला अटक केली आहे. मात्र या प्रकरणातील दुसरा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे. baba khan

दरम्यान, नदीम मोइनुद्दीन खान उर्फ बाबा खान हे मुंब्रा परिसरातील कन्स्ट्रक्शन व्यवसायिक असून ते सोशल मीडियावरही सक्रिय असल्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांची ओळख आहे. या हल्ल्यामागे व्यावसायिक वाद, जुनी शत्रुत्वाची भावना किंवा यापूर्वी मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांचा काही संबंध आहे का याचा तपास पोलिस करत आहेत. baba khan

घटनेनंतर मुंब्रा परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथकही तैनात करण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Shots Fired Outside Social Media Influencer Baba Khan’s House in Mumbra

महत्वाच्या बातम्या