Anil Parab : अक्षय शिंदेप्रमाणेच दोन-चार गुन्हेगारांना उडवून द्या, अनिल परब यांचा संताप

विशेष प्रतिनिधी

मुंबई: Anil Parab  अमली पदार्थ तस्करांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी अक्षय शिंदेप्रमाणेच दोन-चार गुन्हेगारांना उडवून द्या, अशा शब्दांत ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी कठोर कारवाईची मागणी करत प्रशासनाला धारेवर धरले.Anil Parab

सातारा जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये काही महिन्यांपूर्वी सापडलेल्या मोठ्या ड्रग्स साठ्यावरून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाचे पडसाद आता थेट विधिमंडळात उमटले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या हॉटेलचा संबंध थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाशी जोडून सरकारवर गंभीर आरोप केले होते.Anil Parab



अनिल परब म्हणाले, सरकार गंभीर आहे पण सरकारचे कोणी ऐकत नाही अशी सध्या परिस्थिती आहे. चार हजार कोटीचे एमडी ड्रग्स पकडले गेले. पिढी उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. टास्क फोर्स तयार करण्यात आलेला आहे, काही लोकांना पकडले असे सांगण्यात येते. पण केमिकल मिक्स करणारे केमिस्ट आहेत त्यात केमिस्टला पकडण्यात आले आहे का? किती केमिस्ट पकडले याची माहिती सभागृहाला दिली गेली पाहिजे. मागच्या सरकारमध्ये गँगवार कंट्रोल करण्यासाठी जसा एन्काऊंटर स्कॉड बनवला गेला तसा एन्काऊंटर स्कॉड आता बनवणार का? अक्षय शिंदेला जसे उडवले तसे दोन-चार लोकांना उडवा, म्हणजे जीवाची भीती निर्माण झाल्याशिवाय हे थांबणार नाही.

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे म्हणाले, राज्यात एमडी ड्रग्स मोठ्या प्रमाणात चालले आहे. बंद पडलेल्या कारखान्यांमध्ये अशा प्रकारचा व्यवसाय होतो. त्यामुळे येथे सर्च ऑपरेशन करून यावर आळा घातला जाईल का? त्या आरोपींविरोधात मकोका लावण्यात येणार का? असा सवाल उपस्थित केला. यावर योगेश कदम म्हणाले, जावळीमध्ये जी कारवाई झाली, त्या कारवाईत 11 आरोपींवर आपण मकोको लावून कारवाई करत आहोत. राज्यातील काही ग्रामीण ठिकाणी जिथे 40-50 अशी लोकवस्ती आहे तिथे व्यवसाय चालू केले जात आहेत. त्यामुळे सर्वच यंत्रणांना अलर्ट करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

“Encounter a Few Criminals Like Akshay Shinde”: Anil Parab’s Angry Remark

महत्वाच्या बातम्या