विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : येत्या काही दिवसांमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहे. या फेरबदलात आपल्याला मंत्रिमंडळात स्थान मिळावे, यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या काही खासदारांनी फिल्डींग लावली आहे. मात्र,या खासदारांची एकनाथ शिंदे यांनी खरडपट्टी काढल्याचे समजते. आधी काम करा, मग पदाची अपेक्षा ठेवा, असे शिंदेंनी या खासदारांना सुनावले. Eknath Shinde
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या प्रश्नांसंदर्भात असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात पडद्यामागे वेगळ्या घडामोडी सुरु असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री दिल्लीत झालेल्या बैठकीत पक्षाच्या काही खासदारांच्या कामगिरीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
तुम्ही दिल्लीत असलात तरी माझं तुमच्या कामावर लक्ष आहे. तुमच्या सगळ्यांच्या कामाच विश्लेषण होत आहे. आधी काम करा, मग पदाची अपेक्षा ठेवा. पक्षाची आणि सरकारची बाजू सभागृहात जोरदारपणे मांडा. पक्षाचं प्रतिनिधित्व सभागृहात दिसण्यासाठी पूर्णवेळ सभागृहात उपस्थित राहून मुद्दे मांडा. काम करणाऱ्यांचा पक्षाकडून योग्य सन्मान केला जातो, तेच सर्वांना लागू होणार, असे एकनाथ शिंदे यांनी खासदारांच्या बैठकीत सांगितले.
शिवसेना खासदार राहुल शेवाळे सध्या प्रचंड नाराज असल्याची चर्चा आहे. राहुल शेवाळे हे पक्षात दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे नवीन जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा आहे. शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्याकडून राहुल शेवाळे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मंगळवारी रात्री उदय सामंत हे राहुल शेवाळे यांना घेऊन दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत आल्यानंतर राहुल शेवाळ हे श्रीकांत शिंदे यांना भेटले.
Work first, then expect a position, Eknath Shinde’s advice to Shiv Sena MPs
महत्वाच्या बातम्या
- उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर; अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा
- भाजपचे मिशन तमिळनाडू, सुपरस्टार विजय यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर!
- Ambadas Danve ठोकून काढू, कापून टाकू’ म्हणत अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी
- कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ, मुख्यमंत्र्यांचा विश्वास