संजय राऊत उरलीसुरली काँग्रेस संपवण्याच्या मोहिमेवर भाजपची टीका

विशेष प्रतिनिधी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला रसातळाला नेल्यानंतर आता संजय राऊत उरलीसुरली काँग्रेस संपवण्याच्या मोहिमेवर निघालेत. त्यांचा हा खटाटोप केवळ स्वतःचा राज्यसभेचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी आहे, अशी टीका भाजपने शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे.



संजय राऊत सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सातत्याने प्रशंसा करताना दिसून येत आहेत. राहुल गांधी जनतेचा आवाज आहेत. त्यामुळे आपण त्यांना देशाचे पंतप्रधान केले पाहिजे, असे ते नुकतेच म्हणाले होते.
या पार्श्वभूमीवर भाजपचे महाराष्ट्र उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे की, उबाठा आणि शरद पवार गटाला राजकीयदृष्ट्या रसातळाला नेल्यानंतर आता संजय राऊत उरलीसुरली काँग्रेस संपवण्याच्या मोहिमेवर निघालेत, असेच चित्र दिसत आहे. म्हणूनच हल्ली ते उबाठा किंवा शरद पवारांपेक्षा राहुल गांधींचेच जास्त कौतुक करताना दिसतात. तसंही 2028 मध्ये राज्यसभेचा मार्ग काँग्रेसच्या कृपेवरच अवलंबून आहे… आणि म्हणूनच सध्या राऊतांकडून राहुल गांधींचा उदोउदो सुरू आहे.

केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये एक फोटोही पोस्ट केला आहे. त्यात शरद पवार व उद्धव ठाकरे ‘रसातळात’ पाय घसरून पडताना व ‘अरे देवा’ व ‘आमची वाट लावली’ असे म्हणताना दिसून येत आहेत. तर संजय राऊत ‘राहुलजी, वाह. क्या बात है’, असे म्हणताना दिसून येत आहे. राऊत ‘राज्यसभा 2028’ च्या फलकाजवळ राहुल यांना हार घालतानाही दिसून येत आहे.

BJP criticizes Sanjay Raut’s campaign to end Congress

महत्वाच्या बातम्या