विशेष प्रतिनिधी
पुणे : बारामतीत रुग्णालयाच्या नामांतरावरून निर्माण झालेला वाद अखेर निवळला आहे. राज्य सरकारने मागील निर्णय मागे घेत मूळ नाव कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विधानसभेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अधिकृत घोषणा करत संलग्न रुग्णालयाला पुन्हा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांचे नावच कायम राहील, असे स्पष्ट केले. Ajit Pawar
२ मार्च २०२६ रोजीच्या अधिसूचनेनुसार या रुग्णालयाचे ‘स्व. अजित पवार सर्वोपचार रुग्णालय’ असे नामांतर करण्यात आले होते. मात्र, या निर्णयानंतर बारामतीत तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. विशेषतः ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आक्रमक भूमिका घेत हा मुद्दा ओबीसी अस्मितेशी जोडला होता. तसेच संभाव्य पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार देण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.
या वादामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. वाढता विरोध लक्षात घेऊन राज्य सरकारने १३ मार्च रोजीच सुधारित निर्णय घेत नामांतर रद्द करण्याचा निर्णय घेतला. आज विधानसभेत झालेल्या घोषणेनंतर हा वाद अधिकृतरीत्या मिटला असून बारामतीतील राजकीय वातावरण सध्या निवळल्याचे चित्र आहे.
Decision to Name Baramati Medical College After Ajit Pawar Withdrawn
महत्वाच्या बातम्या
- उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर; अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा
- भाजपचे मिशन तमिळनाडू, सुपरस्टार विजय यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर!
- Ambadas Danve ठोकून काढू, कापून टाकू’ म्हणत अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी
- कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ, मुख्यमंत्र्यांचा विश्वास