लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक कॅप्टन अशोक खरात याला पोलीस कोठडी

विशेष प्रतिनिधी

नाशिक: नाशिकमध्ये तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात वावरणारा कॅप्टन अशोक खरात याला गंभीर लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. धार्मिक श्रद्धा, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्र यांचा आधार घेत महिलांचा विश्वास संपादन करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी पहाटे कारवाई करत त्याला ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्याला 23 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये एका 35 वर्षीय विवाहित महिलेची कॅनडा कॉर्नर परिसरात अशोक खरातशी ओळख झाली होती. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत त्याने मंत्रतंत्र आणि धार्मिक विधींमधून तिचा विश्वास जिंकला. त्यानंतर वेळोवेळी तिला कार्यालयात बोलावून तिच्यावर दबाव टाकण्यात आला. आरोपानुसार, गुंगीकारक पदार्थ देऊन आणि धमक्या देत तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आले. नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2025 या कालावधीत हा प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणाचा उलगडा पीडित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर झाला. तीन वर्षे सहन केल्यानंतर तिने सरकारवाडा पोलिस ठाण्यात धाडसाने तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली. तपासादरम्यान कॅनडा कॉर्नर येथील त्याच्या कार्यालयाची झडती घेण्यात आली असता एक पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आला. त्यामध्ये 58 व्हिडिओ सापडल्याची माहिती समोर आली असून, या व्हिडिओंची सखोल चौकशी सुरू आहे. काही नामांकित व्यक्तींचा देखील यात समावेश असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशानेश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असून मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झाल्यानंतर तो अंकशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध झाला होता. अनेक राजकीय नेते, उद्योजक आणि सेलिब्रिटी त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असल्याने त्याची प्रतिमा प्रभावी बनली होती. मात्र आता त्याच्यावर झालेल्या आरोपांमुळे त्याची प्रतिमा पूर्णपणे ढासळली आहे.

पतीचे भविष्य जाणून घेण्यासाठी आलेल्या महिलेला दैवी शक्तीचा खोटा दावा करत ‘तुझ्या पतीचा मृत्यू होईल’ अशी पतीच्या निधनाची भीती घालून २ वर्ष अत्याचार करणाऱ्या ‘कॅप्टन’ अशोक खरातला गुन्हे शाखा १ च्या पथकाने मंगळवारी (दि. १८) रात्री ११.३० वाजता कर्मयोगीनगरमधील बंगल्यातून अटक केली. सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल केला असून, न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. बड्या नेत्यांसह सेलिब्रिटींचे भविष्य सांगणाऱ्या कॅप्टनच्या पेन ड्राईव्हमध्ये ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ मिळाल्याच्या चर्चेने राज्यभरात खळबळ उडाली आहे.

Captain Ashok Kharat Arrested in Sexual Assault Case, Sent to Police Custody

महत्वाच्या बातम्या