विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दूरध्वनीवरून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी संपर्क साधून नुकसानाची सविस्तर माहिती घेत तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, जोरदार वारा आणि काही ठिकाणी गारपिटीसह झालेल्या पावसामुळे काढणीस आलेला गहू, ज्वारी यांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच आंब्याचा मोहर गळून पडला असून द्राक्षबागांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.
या परिस्थितीत नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी, यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
“Unseasonal Rain Damages Crops in Pune District; Deputy CM Sunetra Ajit Pawar Orders Immediate Assessment”
महत्वाच्या बातम्या
- उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर; अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा
- भाजपचे मिशन तमिळनाडू, सुपरस्टार विजय यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर!
- Ambadas Danve ठोकून काढू, कापून टाकू’ म्हणत अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी
- कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ, मुख्यमंत्र्यांचा विश्वास