विशेष प्रतिनिधी
पुणे : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या अत्याचाराच्या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले असून, यात थेट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नाव गोवण्यात आले आहे. शिवसेना (उबाठा) नेत्या सुषमा अंधारे आणि रुपाली ठोंबरे पाटील यांनी चाकणकर यांच्यावर गंभीर आरोपांची सरबत्ती करत, त्यांच्या अटकेची मागणी लावून धरली आहे. Sushma Andhare
चाकणकर स्वतः अघोरी विद्या करायच्या,अंधारेंचे गंभीर आरोप!
सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत पुराव्यांचे फोटो सादर करत खळबळ उडवून दिली. अंधारे यांच्या दाव्यानुसार:
* अघोरी प्रथा: पीडितेच्या माहितीचा हवाला देत अंधारे म्हणाल्या की, चाकणकर स्वतः तंत्रविद्या करत होत्या. सोमवती अमावस्येला विशिष्ट पूजेसाठी त्यांनी आपल्या हाताचे अनामिका बोट कापून रक्ताचा वापर केला होता.
* आर्थिक हितसंबंध: अशोक खरात आणि चाकणकर यांच्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाले असून, त्याची कागदपत्रे लवकरच जाहीर करणार असल्याचे अंधारे यांनी स्पष्ट केले. Sushma Andhare
* कौटुंबिक जवळीक: खरातांच्या वडिलांच्या निधनावेळी चाकणकर तिथे उपस्थित होत्या आणि खरातांची भाची चाकणकरांच्याच घरी वास्तव्यास असल्याचा दावाही त्यांनी केला.
“चाकणकर फरार आहेत”; रुपाली ठोंबरे पाटील आक्रमक!
दुसरीकडे, रुपाली ठोंबरे पाटील यांनी चाकणकर या ‘सहआरोपी’ असल्याचा थेट आरोप केला आहे. पाटील म्हणाल्या की:
“जर वर्षभरापूर्वीच एका पत्रकाराला धमकावण्याऐवजी चाकणकरांनी खरातावर कारवाई केली असती, तर अनेक महिलांची अब्रू वाचली असती. त्यांनी स्वतःच्या लेटरहेडचा वापर करून पोलिसांवर दबाव आणला.”
त्यांनी पुढे असाही दावा केला की, सध्या चाकणकर या फरार असून त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे. अशा व्यक्तीवर कारवाई झाली नाही तर महिलांचा ‘महिला आयोगा’वरचा विश्वास उडेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
सुषमा अंधारे यांच्या प्रमुख ३ मागण्या:
१. तात्काळ अटक: रुपाली चाकणकर यांना ताब्यात घेऊन त्यांची अटक प्रक्रिया पार पाडावी.
२. समोरासमोर चौकशी: भोंदूबाबा खरात आणि चाकणकर यांची समोरासमोर बसवून उलटतपासणी घ्यावी.
३. नार्को टेस्ट: या प्रकरणातील गूढ उकलण्यासाठी चाकणकरांची नार्को टेस्ट करण्यात यावी.
गृहमंत्र्यांकडून कारवाईची अपेक्षा
राज्याचे गृहमंत्री या प्रकरणात सक्रिय असून ते योग्य ती कारवाई करतील, असा विश्वास अंधारे यांनी व्यक्त केला आहे. मात्र, “पुढील काही दिवसांत या प्रकरणातील अनेक बडे मासे आणि धक्कादायक गोष्टी समोर येणार आहेत,” असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.
Chakankar herself practiced black magic; Serious allegations by Sushma Andhare, evidence presented to reporters!
महत्वाच्या बातम्या
- उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर; अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा
- भाजपचे मिशन तमिळनाडू, सुपरस्टार विजय यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर!
- Ambadas Danve ठोकून काढू, कापून टाकू’ म्हणत अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी
- कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ, मुख्यमंत्र्यांचा विश्वास