Kunal Kumar : आयएएस कुणाल कुमार यांची अचानक स्वेच्छानिवृत्ती

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Kunal Kumar  दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुडबुक मध्ये राहिलेले धडाकेबाज आयएएस अधिकारी कुणाल कुमार यांनी आज अचानक प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. ते मार्च अखेरनंतर स्वेचा सेवानिवृत्त होतील. राज्य सरकारने तसे आदेशही काढलेत. कुणाल कुमार यांनी अचानक प्रशासकीय सेवा सोडण्याचा निर्णय का घेतला? याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.Kunal Kumar

कुणाल कुमार हे 1999 च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. ते सध्या राज्य सरकारच्या मुंबई स्थित शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत.Kunal Kumar

त्यांनी 2014 ते 2018 या कालावधीत पुणे महापालिकेचे आयुक्त म्हणूनही काम केले आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात स्मार्ट सिटी मोहीम, 24 तास पाणी पुरवठा व डिजिटल उपक्रमांसह विविध अभिनव उपक्रम राबवले. त्यांनी पुण्यात सर्वाधिक काळ आयुक्त म्हणून काम पाहिले. यामुळे त्यांच्याकडे अजित पवारांच्या गुडबुकमधील अधिकारी म्हणून पाहिले गेले.Kunal Kumar



कुणाल कुमार हे अत्यंत शिस्तप्रिय व कठोर निर्णय घेणारे आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रात 1999 पासून कार्यरत असताना त्यांनी गडचिरोली, नागपूर, भंडारा, कोल्हापूर व जळगाव यासारख्या विविध शहरांत अनेक विभागांमध्ये सेवा बजावली. त्यांनी जळगाव, भंडारा व औरंगाबाद (आताचे छत्रपती संभाजीनगर) या शहरांमध्ये जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले.

कुणाल कुमार यांच्याकडे भू-महसूल व्यवस्थापन व जिल्हा प्रशासनाचा व्यापक अनुभव आहे. त्यांनी नागपूर महापालिकेत तब्बल 2 वर्षे अतिरिक्त आयुक्त व कोल्हापूर महापालिकेत 3 वर्षे आयुक्त म्हणूनही काम केले. त्यामुळे त्यांना शहरी विकास व नगरपालिका प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे आज त्यांनी अचानक स्वेच्छानिवृत्ती घेण्याची घोषणा केल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

सरकारच्या आदेशानुसार, कुणाल कुमार भारतीय प्रशासन सेवेतून स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली आहे. या मार्च अखेरनंतर ते आपल्या पदावरून पायउतार होतील. राज्य सरकारने आजच तसे आदेश दिलेत.

Kunal Kumar Takes Sudden Voluntary Retirement

महत्वाच्या बातम्या