विशेष प्रतिनिधी
पुणे : क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्री करू नये म्हणून भोंदू अशोक खरातने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना फोन केला होता, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता तथा संघटक सचिव विकास लवांडे यांनी केला आहे
कोकाटेंना त्यांच्याकडे असलेली माहिती पुढे आणण्याचेही आवाहन करत या प्रकरणात सुनील तटकरेंसह रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करून त्यांचे व्यवहार तपासले पाहिजेत. कारण अशोक खरात एकटा नसून, त्याची एक मोठी टीम आहे, असा आरोप लवांडे यांनी केला आहे.
विकास लवांडे म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात गाजत आहे. त्याची नवनवीन प्रकरणे बाहेर येत आहेत. हा लिंगपिसाट भोंदू बाबाने गेल्या काही वर्षांत अनेक महिलांचे शोषण केले. अनेक महिलांचे शारीरिक, मानसिक आर्थिक शोषण केले. या प्रकरणात अनेक मोठे राजकीय व्यक्ती व उद्योजक अडकलेत. ही सर्व काळी कृत्य करणे हे त्याचे एकट्याचे काम नाही. त्याच्याभोवती मोठे रॅकेट किंवा मोठी टीम असल्याशिवाय हे शक्य नाही. कारण, आजपर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकला नाही. त्याची कुकर्मे बाहेर आली नाही.
- तालिका सभापती परिस्थिती बघून निर्देश देऊ शकतात, पण ते ब्रह्मवाक्य नाही, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट
विकास लवांडे म्हणाले, अशोक खरातच्या टीममध्ये ज्यांनी आता राज्य महिला आयोगाचा व राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्या रुपाली चाकणकरांचा समावेश आहे. त्यांनी उपकार केल्यासारखे राजीनामे दिलेत. त्या त्याच्यात खरोखर आरोपी आहेत. सुनील तटकरे आरोपी आहेत. हे दोघेही नाशिकच्या विमानतळावर उतरून तेथून गाडीने अनेकवेळा खरातकडे गेले आहेत. अनेक लोकांना त्यांच्या माध्यमातून अशोक खरात भेटला आहे. अशोक खरातचे अनेक व्यवहार या दोघांना माहिती आहेत. त्यामुळे या प्रकरणी खरात, तटकरे व चाकणकरांचे गत काही वर्षांतील सर्व सीडीआर तपासण्याची गरज आहे. त्यांचे मेसेज तपासले पाहिजेत.
यांचा संपर्क कुठे, कसा, काय होत होता? व्यवहार कोणकोणते होत होते? हे तपासले पाहिजे. कारण, त्या ट्रस्टच्या विश्वस्तांची अद्याप चौकशी झाली नाही. त्यांच्यावर अद्याप गुन्हे दाखल झाले नाही. या ट्रस्टवर रुपाली चाकणकर स्वतः विश्वास्त होत्या. या ट्रस्टचे जे कुणी अकाउंटचे काम पाहणाऱ्या सीएवरही गुन्हा दाखल करून चौकशी झाली पाहिजे. कारण, मोठे आर्थिक व्यवहार झाले आहेत, असे ते म्हणाले.
विकास लवांडे म्हणाले, या सर्व प्रकरणात सिन्नरचे आमदार माणिकरावर कोकाटे खरातच्या मार्गात अडथळा ठरत होते. कोकाटे या खरातकडे गेल्याचे कुठेही फोटो नाहीत, कुठेही चर्चा नाही. याच खरातने राज्यात सरकार स्थापन होत असताना सुनील तटकरेंना फोन करून कोकाटेंना मंत्री करू नये म्हणून फोन केला होता. तटकरेंनी सांगावे की किती वेळा खरातने त्यांना विनवण्या केल्या किंवा फोन केले माणिकरावांना मंत्री करू नये म्हणून. रुपाली चाकणकरांनीही तसा आग्रह धरला होता. पण अजित पवारांनी कोकाटेंना मंत्री केले. आज कोकाटेंनी त्यांच्या मतदारसंघात सिन्नरला एवढे मोठे रॅकेट सुरू असताना आता बोलण्याची आवश्यकता आहे.
Kharat Called Tatkare to Block Manikrao Kokate’s Ministerial
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर