मूल होत नसेल तर तुझ्या पत्नीला माझ्याकडे पाठवून दे, नाशिकमधील टीसीएसमध्ये पुरुष कर्मचाऱ्याचाही छळ

विशेष प्रतिनिधी

नाशिक : नाशिक येथील टीसीएस (TCS) शाखेत धर्मांतरण आणि लैंगिक शोषण या प्रकरणात पीडित महिलांनंतर आता एका पुरुष कर्मचाऱ्याने आपली आपबिती सांगितली आहे. त्याला जबरदस्तीने टोपी घालण्यास आणि नमाज पठण करण्यास भाग पाडले गेले. त्याच्या वैयक्तिक आयुष्याचाही क्रूर अपमान करण्यात आला. आरोपीने त्याला म्हटले की, “जर उपचार करूनही तुला मूल होत नसेल, तर तुझ्या पत्नीला माझ्याकडे पाठवून दे.” अशा शब्दांत त्याचा मानसिक छळ करण्यात आला. TCS in Nashik

पीडित कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा छळ २०१२ मध्ये त्याने कंपनीत रुजू झाल्यापासून सुरू झाला होता. त्याचा टीम लीड तौसिफ अख्तर आणि त्याचा सहकारी दानिश शेख यांनी संगनमताने त्याला लक्ष्य केले. कामाच्या ठिकाणी आपल्या अटी मान्य करण्यासाठी ते सर्व कर्मचाऱ्यावर दबाव टाकत असत. जे कर्मचारी त्यांच्या धार्मिक अटी मान्य करत नसत, त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त बोजा टाकून त्यांना त्रस्त केले जात होते.

या प्रकरणात २३ वर्षीय महिला कर्मचाऱ्याने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये तौसिफ आणि दानिश यांची नावे प्रामुख्याने आहेत. दानिशने पीडित महिलेला जबरदस्तीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला आणि लग्नासाठी दबाव टाकला. इतकेच नाही तर तौसिफ आणि एचआर निदा खान यांनी हिंदू देवी-देवतांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह टिप्पण्या केल्याचा आरोपही या महिलेने केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी एका महिला अधिकाऱ्याला गुप्त एजंट म्हणून कंपनीत पाठवून तपास केला आहे.



या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पाच पुरुष आणि दोन महिला अशा एकूण सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत. अनेक महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारींनंतर पोलिसांनी या टोळीविरुद्ध एकूण नऊ गुन्हे दाखल केले आहेत. पीडित पुरुष कर्मचाऱ्याने सांगितले की, हे सर्व आरोपी वारंवार हिंदू धर्माचा अपमान करत असत आणि महाराष्ट्रातील आदरणीय महापुरुषांबद्दलही हीन दर्जाची विधाने करत असत.

धर्मांतराच्याया कटात कर्मचाऱ्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवरही हल्ला करण्यात आला. पीडित कर्मचाऱ्याने सांगितले की, तो कट्टर शाकाहारी असूनही नाईट शिफ्ट संपल्यानंतर त्याला जबरदस्तीने हॉटेल्समध्ये नेले जायचे. तिथे त्याच्यावर मांसाहारी जेवण घेण्यासाठी दबाव टाकला जात असे. जेव्हा त्याने नकार दिला, तेव्हा त्याच्या धार्मिक श्रद्धेची चेष्टा केली जायची.

२०२३ च्या ईदच्या दिवशी तौसिफ याने पीडित कर्मचाऱ्याला आपल्या घरी नेले. तिथे त्याला जबरदस्तीने धार्मिक टोपी घालण्यास लावली आणि नमाज वाचायला लावला. इतक्यावरच न थांबता, त्याचे फोटो काढून त्याला अपमानित करण्यासाठी ऑफिसच्या अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर केले. जेव्हा पीडिताने या गोष्टीला विरोध केला, तेव्हा तौसिफने त्याला टेबल फॅन फेकून मारले आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

Male Employee Alleges Harassment at TCS in Nashik

महत्वाच्या बातम्या