संतोष देशमुख प्रकरणानंतर मसाजोगमध्ये मतदान; उद्या ठरणार गावाचा नवा सरपंच

विशेष प्रतिनिधी

बीड: दिवंगत संतोष देशमुख यांची खंडणी प्रकरणांतून अपहरण आणि हत्या झाल्यानंतर,दीड वर्षांनी मसाजोग सरपंच पदासाठी मंगळवारी मतदान पार पडले. मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला असला तरी, दुपारी दोन गटांमध्ये तुरळीक वाद झाल्याचे पहायला मिळाले.अनुचित प्रकार घडणे अगोदर पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

मतदान केंद्रावरील मतदान थांबल्याची अफवा उडाल्याने, काही काळ तणाव निर्माण झाला.मात्र पोलिसांनी दखल घेत असा कुठलाही प्रकार घडलेला नाही,मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याचे सांगितले.पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त देखील मतदान केंद्रावर लावण्यात आला होता.मसाजोगच्या सरपंचपदी कोण बसणार?याचा निकाल उद्या हाती येणार आहे.



संतोष देशमुख यांनी गावासाठी खूप काही केलं आहे,गावकरी आम्हालाच साथ देतील,असा विश्वास अश्विनी देशमुख यांनी व्यक्त केला. तर ही निवडणूक आमच्यावर लादण्यात आली, माझी निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती. जेवढा संघर्ष मला संतोष देशमुख हयात असताना करावा लागला नाही,तेवढा आता करावा लागत आहे,असे सांगत मतदार याला चोख उत्तर देतील,अशी प्रतिक्रिया अश्विनी देखमुख यांनी दिली.

तर, तो देशमुख यांचा कुटुंबा बाबत आम्हाला सहानुभूती आहे. न्यायालयीन प्रकरणात त्यांच्या कुटुंबासोबत आमचा संपूर्ण पाठिंबा आहे,पण राजकारणात नाही,असे स्वरूपानंद देशमुख यांनी सांगितले. मी ग्रामपंचायत मध्ये मागील अनेक वर्षांपासून काम केले, यावेळी गावासाठी अनेक योजना राबवल्या. माझे काम गावातील लोकांसमोर आहे. त्यामुळे मला खात्री आहे की, गावातील मतदार मला पुन्हा एकदा संधी देतील,असा विश्वास स्वरूपानंद देशमुख यांनी व्यक्त केला.

Voting in Masajog after Santosh Deshmukh case; New village sarpanch to be elected tomorrow

 

महत्वाच्या बातम्या