विशेष प्रतिनिधी
पुणे: Raj Thackeray महाराष्ट्रात राज्यकर्ते शाळा विकत चालले असतील तर तो शाळांचं जागेचा विषय आहे. मराठी माध्यमांच्या शाळा ज्या जागेवर आहे तिथल्या जागांवर डोळा आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.Raj Thackeray
पुण्यात राज ठाकरे यांच्या हस्ते वरुण राज भिडे स्मृती पुरस्कार देण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले, राज ठाकरे मराठी भाषेबद्दल बोलतो ते लोकांसाठी बोलतो, पश्चातापाचा हाथ मारून काही फायदा नाही. सध्या भैय्यांना मराठी शिकवायचं चाललं आहे. भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील.Raj Thackeray
पत्रकारांनी एकत्र राहावे ही काळाची गरज, तुम्ही एकत्र राहू नये हे सत्ताधाऱ्यांची गरज असल्याचे सांगताना ठाकरे म्हणाले, पत्रकारितेतून मी आलो आहे. अनेक ठिकाणी मी काम केलं आहे. घरातच माझ्या ती गोष्ट होती. पत्रकारिता बदलली आहे, यात काही संशय नाही. तुम्ही किती गोष्टी दाखवा, किती लिहा पण सरकारला काही त्याचा फरक पडत नाही ही गोष्ट महत्त्वाची आहे. अनेक चांगले पत्रकार मंत्र्यांकडे काम करत आहेत. तुम्ही लिहित राहाल, बोलत राहाल पण त्याने सत्ता जाते सत्ता येते हा समज असेल तर सगळ्यांनी मिळून एकत्र काम करण्याची गरज आहे.
राज ठाकरे म्हणाले, सर्व पत्रकारांना सांगणे आहे की दबाव आला तर त्यांच्या बातम्या टाकने बंद करा. जिथे जमीन भुसभुशीत असतात तिथेच घुशी होतात, खडकात घुशी होत नाहीत
आज पुण्याची अवस्था बघा. मूळ पुणे वेगळं, काही आकार उकार नाही. पुण्यात पाणी तुंबणार कारण कोणाचे लक्षच नाही. मुंबईत हजारो एकर जागा गोदरेजची आहे. सरकारी जमिनीवर अनधिकृत कामं कशी झाली? कुठल्याच नगरसेवकाला, आमदाराला आपलेपणाची भावना राहिली नाही. हावरटपणा आणि बजबजपुरी सुरु आहे. अदानी विषय मांडून पुढे काय झालं? पत्रकारांनी तो विषय का नाही धरुन लावला? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
संयुक्त महाराष्ट्र झाला तो म्हणजे 1 मे पण महाराष्ट्र दिन दिवशी मुंबईतल्या मराठी लोकांना बाहेर येऊन वंदन करण्याची जाणीव नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray Alleges Grab on Marathi-Medium School Lands
महत्वाच्या बातम्या
- मराठी अनिवार्यतेवर सरकार ठाम; चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतीची शक्यता..
- प्रताप सरनाईक सर्वात मोठे भूमाफिया, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची पोलिसांत तक्रार
- शिवसेनेत गोऱ्हे – कडूंचा नावाला विरोध? एकनाथ शिंदेच्या पुढचा पेच वाढला…
- धर्माच्या भावनेने बघू नका, मराठी आलीच पाहिजे : इम्तियाज जलील यांचे मुस्लिम समाजाला आवाहन