विशेष प्रतिनिधी
पुणे : Supriya Sule खासदार सुप्रिया सुळे या पुणे ते मुंबई प्रवासादरम्यान आज महामार्गावरून जात असताना एका वाहन चालक बेदरकार वाहन चालवत असल्याने सुप्रिया सुळे यांच्या गाडीला धडक दिली. सुदैवाने यात काही दुर्देवी घडले नाही.Supriya Sule
याबाबत सुप्रिया सुळे यांनी पोस्ट करत माहिती दिली आहे. सुळे यांनी संबंधित गाडी चालकाचा नंबर देखील शेअर केला आहे. जीजे 13 सीएफ 5257 या क्रमांकाच्या वाहनाने निष्काळजीपणे आणि वेगात वाहन चालवत बाजूने धडक दिल्याने हा अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्वजण सुरक्षित बचावले. सीट बेल्ट घातल्यामुळे मी बचावले असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.Supriya Sule
या घटनेनंतर महामार्गावरील वाढत्या बेफिकीर वाहनचालकांबाबत चिंता व्यक्त होत आहे. अतिवेग, निष्काळजीपणा आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे अनेकांचे जीव धोक्यात येत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले.
नागरिकांनी सीट बेल्टचा वापर करावा, सतर्क राहावे आणि जबाबदारीने वाहन चालवून रस्ते सुरक्षित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, अजित पवार यांचा घातपात करण्यात आला त्याच पद्धतीने खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला गुजरातमधल्या एका गाडीने अतिशय भयानकपणे टक्कर दिली. सुप्रिया सुळे देशाच्या नेत्या आहेत. अजित दादा नंतर सुप्रिया सुळे महत्त्वाच्या नेत्या आहेत. सुप्रिया सुळेंना अपघातात बरं वाईट करण्याचा हा प्रयत्न नव्हता ना अशी आमच्या मनात शंका आहे. राज्य सरकारने कसून चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुनिल माने यांनी केली आहे.
Supriya Sule escapes narrowly after car accident on Pune-Mumbai Expressway
महत्वाच्या बातम्या
- सुनेत्रा पवारांनी देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्ड मोडला
- सुनेत्रा पवारांनी मोडला अजितदादांचा 2024मधील विक्रम; १ लाख १२ हजार २६८ मतांनी आघाडीवर
- विजयचा दणका, स्टॅलिन यांच्यासह द्रमुक मंत्रिमंडळातील 32 पैकी 31 मंत्री पिछाडीवर
- बंगाल-आसाममध्ये भाजपची झेप; तामिळनाडूत थलपती विजयच्या पक्षाची ‘ब्लॉकबस्टर’ एन्ट्री, केरळमध्ये काँग्रेसला दिलासा