प्रदूषणामुळे कॅन्सर वाढतोय! ‘चलो PMC’च्या माध्यमातून पुणेकरांचा प्रशासनाला इशारा; डॉक्टरांनी प्रशासनाला धरले धारेवर..

विशेष प्रतिनिधी

पुणे: शहरातील वाढते प्रदूषण,बेकायदेशीर झाडांची कत्तल,वाहतूक कोंडी आणि इतर नागरी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ‘ चलो PMC ‘ या सामान्य नागरिकांच्या चळवळीने पुणे प्रशासनाला चांगलेच खडसावले आहे.व्यावसायिक,डॉक्टर,अभियंते,कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारे नागरिक आणि सामान्य पुणेकरांच्या सहभागाने निर्माण झालेल्या या चळवळीने पुणे महापालिकेला धारेवर धरले.

‘ चलो PMC ‘ ही चळवळ शहरातील अमित सिंग यांनी २०२३ मध्ये सुरू केली होती.पुण्यातील सामान्य नागरिकांच्या अडचणी महापालिकेपर्यंत पोहोचाव्यात आणि समस्यांचे निवारण व्हावे,हे या चळवळीचे उद्दिष्ट आहे.शहरातील जवळपास १० हजार नागरिक या चळवळीत जोडले गेले आहेत.



डॉ.राहुल सावंत यांची प्रशासनावर टीका..

शहरातील हृदयरोग तज्ञ डॉ.राहुल सावंत यांनी परखड शब्दात पुणे शहर प्रशासनाच्या धोरणांवर टीका केली.ते म्हणाले की,’ पुण्यातल्या वाढत्या प्रदूषणामुळे कॅन्सर सारखे आजारांचा नागरिकांना विळखा पडतोय.१९९२ मध्ये पुणे शहरात अवघे २ ते ३ कॅन्सर उपचाराचे रुग्णालय होते.मात्र आज शहरात लाखो कॅन्सरचे रुग्ण आहेत,कारण शहरात विकासाच्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास केला जात आहे ‘.

डॉ.सावंत यांनी शहरातील मेट्रो प्रकल्पाच्या विकासादरम्यान झालेल्या अधिक वृक्षतोडी संदर्भात देखील नाराजी व्यक्त केली.शहरात विकासाच्या नावाखाली झाडांच्या उरावर बसून मोठ्या इमारती उभारल्या जात आहेत.एखाद्या कुटुंबातील कॅन्सरमुळे गमावलेल्या सदस्याची किंमत रुपयांमध्ये कधीच मोजता येणारं नाही, असे स्पष्ट करत त्यांनी प्रशासनासमोर अनेक प्रश्न उपस्थित केले.

‘ चलो PMC ‘ ही शहरातील पूर्णपणे अराजकीय असलेली नागरी चळवळ आहे.ही चळवळ शहरातील २५०० अधिक सोसायटीमध्ये तब्बल दोन लाख नागरिकांपर्यंत पोहोचली आहे.

Cancer is increasing due to pollution! Punekars warn the administration through ‘Chalo PMC’; Doctors put the administration on edge..

 

महत्वाच्या बातम्या