परदेश दौरा रद्द, बैठका ऑनलाईन, पंतप्रधानांच्या आवाहनानंतर आशिष शेलार यांचे निर्णय

विशेष प्रतिनिधी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी परदेश दौरा रद्द करण्याबरोबरच आपल्या विभागासाठी तीन महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत.

आशिष शेलार यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले की, देशासमोरील आर्थिक आणि इंधन संकट पाहता आमच्या विभागाने तातडीने काही पावले उचलली आहेत. जागतिक चित्रपट महोत्सवासाठी (Cannes) विभागाकडून कोणाही प्रतिनिधीने जाऊ नये, असा निर्णय घेण्यात आला आहे. विभागाच्या कामकाजासाठी इंधनावरील वाहने टाळून केवळ इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) वापर केला जाईल. उद्यापासून माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक विभागाच्या सर्व बैठका प्रत्यक्ष न होता ऑनलाइन स्वरूपात पार पडतील, जेणेकरून प्रवासावरील इंधन खर्च वाचवता येईल.



शेलार म्हणाले की, “सध्याची जागतिक युद्धाची परिस्थिती पाहता पुरवठा साखळीवर मोठा ताण आहे. अशा वेळी आयातीवर मर्यादा घालणे आणि भारतीय रुपयाचे मूल्य संतुलित ठेवणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. आपल्याला वैयक्तिक जीवनातही काही बंधने घालून घ्यावी लागतील. बाहेर फिरण्याचे प्रमाण कमी करावे लागेल. देश हे आपले कुटुंब असून देशहितासाठी हे पाऊल उचलणे गरजेचे आहे.”
राहुल गांधी ‘हे मोदींचे अपयश आहे’. या टीकेचा आशिष शेलार यांनी कडाडून समाचार घेतला. “राहुल गांधींचे विधान हे त्यांच्या अज्ञानाचा पुरावा आहे. देश प्रगती करत असताना त्यांना केवळ पोटदुखी होत आहे. जागतिक संकटाच्या काळात देशहितासाठी केलेल्या आवाहनावर राजकारण करणे दुर्दैवी आहे,” असा टोला शेलार यांनी लगावला.

Ashish Shelar Cancels Foreign Tour, Shifts Meetings Online After PM Modi’s Appeal

 

महत्वाच्या बातम्या