विशेष प्रतिनिधी
पुणे: महापालिकेकडून कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी उरुळी देवाची येथे ५०० मेट्रिक टन क्षमतेचा घनकचरा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.पण निविदेच्या अटी आणि शर्ती निश्चित करताना दोन्ही प्रकल्प एकच ठेकदार चालवेल अशी अट टाकण्यात आली आहे.त्यामुळे हा निर्णय आता वादाच्या केंद्रस्थानी सापडला आहे.
शहरात सध्या रोजी जवळपास २५०० मेट्रिक टन कचरा संकलित केला जातो.मात्र शहरात कचऱ्याचे प्रमाण जास्त आणि प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्पाची क्षमता कमी आहे.त्यामुळे दिवसेंदिवस शहरात कचऱ्याची समस्या अत्यंत गंभीर आहे.याचसदर्भात महापालिका स्थायी समितीपुढे पाच – दोन – दोन या नियमाखाली प्रस्ताव दाखल करण्यात आला.मात्र निविदा न काढता ठराविक एकाच ठेकेदाराला हा प्रकल्प १५ वर्षांसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.मात्र,हा निर्णय धुडकावण्यात आला होता.आता सदरील प्रकल्पासाठी पुन्हा एकदा नवीन निविदा काढण्याची तयारी महापालिकेकडून करण्यात येत आहे.
नवीन प्रस्तावात काय?
घनकचरा विभागाच्या नवीन प्रस्तावानुसार, उरुळी देवाची याठिकाणी दोनशे टन क्षमता असलेला सुक्या कचऱ्याचा आणि ३०० टन क्षमता असलेला ओल्या कचऱ्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.आता या दोन्ही प्रकल्पासाठी एकच निविदा काढली जाणार आहे.
घनकचरा विभागाचे उपायुक्त प्रसाद काटकर यांनी स्पष्ट केले की,’ शहरात कचरा जास्त आणि प्रक्रिया करण्याच क्षमता कमी झाली आहे.मात्र आता ही निविदा आयुक्तांच्या सीसीव्ही नियमानुसार काढली जाईल’.
Pune’s garbage problem is serious; Discussion on the new proposal of the Municipal Corporation
महत्वाच्या बातम्या
- CM Fadnavis : शेजारील देशांत पेट्रोल ४५० रुपये; आपण वेळीच सावध व्हायला हवे, पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा
- Rupali Chakankar : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकरांची ६ तास कसून चौकशी, पूजा-विधी, आर्थिक व्यवहार आणि राजकीय संबंधांवर प्रश्नांची सरबत्ती
-
‘पंचवटी’वरून गदिमा कुटुंबात वाद; पुनर्विकासाच्या हालचालींना सौमित्र माडगूळकर यांचा तीव्र विरोध