विशेष प्रतिनिधी
पुणे: नीट पेपरफुटीचा तपासात आता महत्वाचे धागेदोरे हाती येत आहेत.याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या धनंजय लोखंडे याच्या मित्राला आता पोलिसांकडून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. ओंकार शिंगोटे ताब्यात घेतलेल्या संशयित विद्यार्थ्याचे नाव असून,पुण्यातील वाघोलीतील महाविद्यालयात तो आयुर्वेदिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होता.
ओंकार शिंगोटे या संशयित तरुणाला बुधवारी पोलिसांनी ताब्यात घेतले.ओंकार शिंगोटे हा पूर्वीच अटकेत असलेल्या धनंजय लोखंडे याचा जवळचा मित्र आहे.धनंजय लोखंडे या पेपरफुटी प्रकरणातील महत्वाचा आरोपी मानला जात आहे,पेपरफुटी प्रकरणात धनंजय लोखंडेने पुणे आणि नाशिक जिल्ह्यात मोठे जाळे पसरवले होते.
धनंजय लोखंडे नेमका कोण?
नीट पेपरफुटी प्रकरणात धनंजय लोखंडे सध्या राज्यभर चर्चेत आला असून, राहुरी तालुक्यातील मोहेगाव – महाडुक सेंटर येथील येथील रहिवासी आहे.धनंजय लोखंडेचे वडील हे शैक्षणिक संस्थेत क्लार्क असून त्याचा कुटुंबात दोन भाऊ आहेत.लोखंडेने कर्नाटक मधील मंगळुरू विद्यापीठातून BAMS डिग्री मिळवली आहे.मागील चार ते पाच वर्षापासून ते पुण्यातील वाघोली येथे प्रॅक्टिस करत असून,मेडिकल ऍडमिशन संदर्भात कन्सल्टिंग चे देखील काम करत होता.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात आलेल्या या परीक्षेची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती,पुढे हे प्रकरण सीबीआय कडे सोपवण्यात आले आहे.राजस्थान,हरियाणा आणि महाराष्ट्र या तीन राज्यात पेपर फुटीचे जाळे पसरले आहे.ओंकार शिंगोटेकडून इतर आर्थिक व्यवहार आणि अजून काही एजंटची माहिती समोर येण्याबाबत शक्यता वर्तवल्या जात आहेत.
NEET paper leak case from Wagholi; BAMS student taken into custody
महत्वाच्या बातम्या
- १०५ दिवसांत मराठी शिका, अन्यथा १६ ऑगस्टपासून कारवाई; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा
- काँग्रेसने द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसला; तमिळनाडूतील सत्तांतरावर मोदींचा हल्लाबोल
- अशोक खरात प्रकरणात चार मंत्र्यांवर गंभीर आरोप, नाना पटोलेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी
- भोंदू अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांची एसआयटीसमोर चौकशी