विशेष प्रतिनिधी
पुणे: Supriya Sule देशासमोर उभ्या ठाकलेल्या ऊर्जा आणि आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतःसाठी देण्यात आलेला पोलीस बंदोबस्त आणि शासकीय वाहने तातडीने काढून घेण्याची विनंती राज्य सरकारकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला अधिकृत आवाहन केले असून, सोशल मीडियावरही याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.Supriya Sule
सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सध्या भारतासमोर भीषण आर्थिक तसेच ऊर्जा संकट उभे राहिले आहे. त्यामुळे इंधन, वीज आणि इतर शासकीय संसाधनांचा अत्यंत काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शासनाच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडू नये आणि इंधन बचतीला हातभार लागावा, या उद्देशाने आपण स्वतःपासून व्हीआयपी सुविधांचा त्याग करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले.Supriya Sule
“माझ्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेला पोलीस बंदोबस्त आणि त्यासाठी वापरण्यात येणारी शासकीय वाहने कृपया तातडीने काढून घ्यावीत. देशावरील ऊर्जा आणि आर्थिक संकट दूर झाल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन गरज भासल्यास या सुविधा पुन्हा बहाल करण्याचा विचार करता येईल,” असे त्यांनी आपल्या आवाहनात म्हटले आहे.
देशातील सध्याच्या परिस्थितीचा उल्लेख करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील नागरिकांना काटकसरीचे आवाहन केल्याची आठवण करून दिली. त्याच धर्तीवर सार्वजनिक जीवनातील लोकप्रतिनिधींनीही जबाबदारीची भूमिका घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सूचित केले.
सुप्रिया सुळे यांच्या या निर्णयाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, आर्थिक शिस्त आणि संसाधन बचतीच्या मुद्द्यावर त्यांनी घेतलेली भूमिका लक्षवेधी ठरत आहे.
Supriya Sule declines VIP security and government vehicles amid energy and economic
महत्वाच्या बातम्या