विशेष प्रतिनिधी
बीड : Sangram Jagtap पोलिस प्रशासनाला आजच सांगतो, 26 तारखेला बैल कापला गेला तर 27 तारखेला इथे आम्ही येऊ, असा इशारा देत आमदार संग्राम जगताप यांनी या झुरळांना हिंदुत्ववादी लोकांनी घाबरू नये असे आवाहन केले.Sangram Jagtap
बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे आयोजित हिंदू जन आक्रोश मोर्चादरम्यान एका सभेत बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले “शुरूवात वो लोग करते है लेकीन खत्म हम करते है. जनगणना झाली तर यांची संख्या 40 कोटींच्या पुढे जाईल.Sangram Jagtap
एका 6 वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराचा आणि तक्रार देण्यासाठी गेल्यावर पोलीस स्टेशनवर झालेल्या दगडफेकीचा संदर्भ देत संग्राम जगताप म्हणाले, हे लोक लोकांना भयभीत करतात, परंतु या झुरळांना आता घाबरण्याची अजिबात गरज नाही. ही विचारधारा हिंदुत्ववादी लोकांनी विसरता कामा नये.Sangram Jagtap
संग्राम जगताप म्हणाले, पोलिस प्रशासनाला आजच सांगतो, 26 तारखेला बैल कापला गेला तर 27 तारखेला इथे आम्ही येऊ. तुम्ही जरा खबरदारी घ्या. राजकीय पक्ष जरी काम करत नसले तरी आपल्याला हिंदू म्हणून काम करावे लागेल. या लोकांशी कुठलाही आर्थिक व्यवहार करायचा नाही, हा कायदा आपण करून टाका, हे आपल्याला ठरवावे लागणार आहे. आपले संघटन कायम ठेवा. हिंदू समाज कधीही थांबणार नाही.
यावेळी बोलताना भाजपचे आमदार महेश लांडगे म्हणाले, 6 वर्षांच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न होतो, पण मदत होत नाही. सर्वधर्म समभावाचा बुडबुडा बाहेर काढा. जो कायदा मानणार नाही, त्यासाठी दांडे हातात घ्या. आपल्यामध्ये काही पुरोगामी विचारांचे किडे आहेत. पुरोगामी विचारांच्या राजकीय लोकांना लाज वाटली पाहिजे. आमच्याकडे पण मतदार आहेत, पण आम्ही स्वार्थी नाहीत. छत्रपती संभाजीनगरला परवा एकाचे घर पाडले. पोलिसांनी जरा गांभीर्याने घ्यावे, पोलिसांनी जर अशा पद्धतीने पक्षपात केला, न्याय दिला नाही तर मग दंगल झाली तर तुम्ही जबाबदार असाल.
“Hindutva supporters should not fear these cockroaches,” says MLA Sangram Jagtap
महत्वाच्या बातम्या
- सोलापूर स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपचं पारडं जड; कुणाला मिळणार संधी?
- महाराष्ट्रात ‘कर्करोग ग्रीड’ तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- नीट-यूजी २०२६’ पेपरफुटी प्रकरणावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
- पुण्यात कॅन्सर रुग्णालयाच्या उद्घाटनाआधीच वाद; श्रीनाथ भिमाले यांच्या वडिलांचे नाव दिल्याने चर्चा