विशेष प्रतिनिधी
बीड : मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि प्रमुख आरोपी वाल्मीक कराड यांची बीड जिल्हा कारागृहात अचानक प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांना गुप्तांगाच्या भागात तीव्र वेदना आणि गंभीर संसर्गाचा त्रास होत असून त्यामुळे कारागृह प्रशासन आणि वैद्यकीय विभागात खळबळ उडाली आहे. प्रकृती अधिक बिघडू नये म्हणून सध्या त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. Valmik Karad
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वाल्मीक कराड यांना गेल्या काही दिवसांपासून लघवीसंबंधित गंभीर त्रास जाणवत होता. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता मूत्रमार्गाशी संबंधित संसर्गाची लक्षणे आढळून आली. वाढत्या वेदना आणि अशक्तपणामुळे त्यांना कारागृहातच सलाईन लावण्यात आले असून डॉक्टरांच्या विशेष देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. कारागृह प्रशासनाकडून त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात कट रचल्याचा मुख्य आरोप असलेले वाल्मीक कराड सध्या बीड जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी चर्चा निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत प्रमुख आरोपीची प्रकृती अचानक खालावल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
वैद्यकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कराड यांना मूत्राशय आणि मूत्रमार्गाशी संबंधित गंभीर संसर्ग झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. संसर्ग वाढल्यामुळे त्यांना असह्य वेदना होत असून चालणे आणि दैनंदिन हालचाली करणेही कठीण होत असल्याचे समजते. कारागृहातील उपलब्ध वैद्यकीय सुविधा मर्यादित असल्याने आवश्यक असलेले विशेष उपचार आणि तपासण्या तेथे करणे शक्य नसल्याचे डॉक्टरांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
याच पार्श्वभूमीवर कारागृह प्रशासनाने पुढील उपचारांसाठी वाल्मीक कराड यांना आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तेथे मूत्ररोग तज्ज्ञांकडून त्यांची सखोल तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
प्रशासकीय सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या गुरुवारपर्यंत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही किंवा उपचारांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, तर कोणताही विलंब न करता त्यांना तातडीने आंबेजोगाई येथे हलवण्यात येणार आहे. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीविषयी अधिकृत वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा असून कारागृह प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
Valmik Karad’s health deteriorates in jail; likely to be shifted to Ambejogai hospital
महत्वाच्या बातम्या
- सोलापूर स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपचं पारडं जड; कुणाला मिळणार संधी?
- महाराष्ट्रात ‘कर्करोग ग्रीड’ तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- नीट-यूजी २०२६’ पेपरफुटी प्रकरणावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
- पुण्यात कॅन्सर रुग्णालयाच्या उद्घाटनाआधीच वाद; श्रीनाथ भिमाले यांच्या वडिलांचे नाव दिल्याने चर्चा