विशेष प्रतिनिधी
मुंबई : Aaditya Thackeray खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य करताना शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी सूचक इशारा दिला आहे. “परवा झालेल्या बैठकीला कोण उपस्थित होते, हे आम्हा सगळ्यांना दिसत आहे. उद्धव साहेबांचे मन खूप मोठे आहे. ज्यांना पक्षात परत यायचे आहे, त्यांचे स्वागतच आहे. मात्र, जे पक्षाच्या विरोधात उघडपणे जातील, त्यांच्यावर कारवाई निश्चित होईल,” असे आदित्य ठाकरे म्हणाले.Aaditya Thackeray
ओमराजे निंबाळकर यांच्याशी अद्याप कोणताही संपर्क झालेला नसल्याचे सांगताना त्यांनी टोला लगावला. “त्यांचे सध्या तळ्यात-मळ्यात सुरू असो, पण त्यांनी डुबायला नको, हे आता पूर्णपणे त्यांच्यावरच अवलंबून आहे,” असे ते म्हणाले.Aaditya Thackeray
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोल्हापूर दौऱ्यात शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “अशा फालतू गोष्टींकडे आम्ही लक्ष देत नाही. शिवसेना नेमकी कोणाची आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला चांगलेच ठाऊक आहे. अमित शाह यांच्या स्वागतासाठी केवळ गुलामांनी बॅनर्स लावले आहेत. ज्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी राजकीय जीवदान दिले, तेच आज शिवसेना आणि ठाकरे कुटुंब संपवण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
महायुतीच्या कथित पक्षफोडीच्या राजकारणावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी “ऑपरेशन तुडवा”चा इशाराही दिला. “राज्यात एकच खरी शिवसेना आहे. दुसरी केवळ गुलामांची टोळी आहे. एका चोराला मुख्यमंत्री बनवण्यासाठी हा सगळा खेळ सुरू आहे. संजय राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे आता कुठे ना कुठे ‘ऑपरेशन तुडवा’ पाहायला मिळणार आहे,” असे ते म्हणाले.
दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या बहुचर्चित हत्या प्रकरणात सीबीआय न्यायालयाने माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालामुळे ओमराजे निंबाळकर यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
निकालानंतर नाराजी व्यक्त करत ओमराजे यांनी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, गेल्या काही दिवसांपासून ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. मात्र, “मी माझ्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतरच पुढील राजकीय निर्णय घेईन,” असे ओमराजे यांनी स्पष्ट केले.
Aaditya Thackeray’s jab at Omraje: Whether he sinks or swims is up to him
महत्वाच्या बातम्या
- Shinde Sena : मुंबई महापालिकेत ‘ऑपरेशन टायगर’? ठाकरे गटातील 25 नगरसेवक संपर्कात असल्याचा शिंदे सेनेचा दावा
- Deepak Sawant : मुंबई महापालिकेत ठाकरे गटाला झटका, दीपक सावंत यांचे जात प्रमाणपत्र अवैध
- Sanjay Raut : मानहानीच्या खटल्यात संजय राऊत यांच्या निर्दोषमुक्तीला मेधा सोमैया यांचे हायकोर्टात आव्हान
- BEST Employees’ : न्यायालयाच्या आदेशानंतरही बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप