विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : Anna Hazare राज्य सरकारने माहिती अधिकार (RTI) कायद्याच्या अंमलबजावणीच्या नियमांमध्ये केलेल्या बदलांवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारला थेट इशारा दिला आहे. माहिती अधिकार हा देशातील सामान्य नागरिकांचा मूलभूत लोकशाही अधिकार असून तो सरकारसाठी पैसे कमावण्याचे साधन नसल्याचे अण्णांनी स्पष्ट केले.Anna Hazare
राज्य शासनाने १२ जून रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार RTI अर्जाचे शुल्क १० रुपयांवरून ३० रुपये करण्यात आले आहे. तसेच माहितीच्या प्रतींसाठी प्रति पान आकारले जाणारे शुल्क २ रुपयांवरून ५ रुपये करण्यात आले आहे. याशिवाय प्रथम अपिलासाठी ५० रुपये आणि द्वितीय अपिलासाठी १०० रुपये शुल्क आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे.Anna Hazare
या निर्णयावर टीका करताना अण्णा हजारे म्हणाले, “काही लोक माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर करतात हे मान्य आहे. त्यासाठी नाममात्र शुल्क आकारणे योग्य असू शकते. मात्र सरकारचा उद्देश या कायद्यामधून महसूल गोळा करणे असू नये. माहिती अधिकार हा सामान्य नागरिकांना शासनाला जाब विचारण्याचे प्रभावी साधन आहे. नव्या नियमांमुळे गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना माहिती मिळवणे कठीण होईल.”
अण्णांनी पुढे म्हटले की, माहिती अधिकार कायदा हा शासनातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी अस्तित्वात आला. या कायद्यामुळे अनेक भ्रष्टाचार प्रकरणे उघडकीस आली आणि नागरिकांना प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याचे प्रभावी साधन मिळाले. मात्र वाढीव शुल्कामुळे माहिती मागण्याचा अधिकार आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी मर्यादित होण्याची भीती आहे.
फडणवीस सरकारने हे जाचक नियम तातडीने मागे घेऊन पूर्वीची शुल्क रचना कायम ठेवावी, अशी मागणी करत अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशाराही दिला. “सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही, तर या वयातही मला पुन्हा जनआंदोलन आणि उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असे ते म्हणाले.
दरम्यान, RTI कार्यकर्ते आणि पारदर्शकतेसाठी काम करणाऱ्या विविध संघटनांनीही या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली असून राज्य सरकारने शुल्कवाढीचा निर्णय पुनर्विचारासाठी मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे. नव्या नियमांमुळे माहिती अधिकार कायद्याचा वापर कमी होण्याची आणि नागरिकांच्या सहभागावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Anna Hazare warns of agitation over RTI fee hike, demands rollback of new rules
महत्वाच्या बातम्या
- Shinde Sena : मुंबई महापालिकेत ‘ऑपरेशन टायगर’? ठाकरे गटातील 25 नगरसेवक संपर्कात असल्याचा शिंदे सेनेचा दावा
- Deepak Sawant : मुंबई महापालिकेत ठाकरे गटाला झटका, दीपक सावंत यांचे जात प्रमाणपत्र अवैध
- Sanjay Raut : मानहानीच्या खटल्यात संजय राऊत यांच्या निर्दोषमुक्तीला मेधा सोमैया यांचे हायकोर्टात आव्हान
- BEST Employees’ : न्यायालयाच्या आदेशानंतरही बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप