विशेष प्रतिनिधी
गिरगाव :- कोळी बांधवांच्या गिरगाव चौपाटीवरील बोटींवर काही दिवसांपुर्वी शासनाने कारवाई केली होती. त्यामुळे कोळी बांधवांचा रोजगार सध्या कमी होत चालला आहे.यासाठी आता मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. पारंपरिक मासेमारी कमी होत असल्यानं त्याना दुसरे रोजगाराचे साधन मिळुन देण्यासाठी मनसेनं सहाय्यक आयुक्तांना पत्र लिहिले आहे.या पत्रात मनसेने गिरगाव चौपाटीवर कोळी बांधवांसाठी फूड स्टॉल बांधून देण्याची मागणी केली आहे.. Koli community
मुंबईवर सुरुवातीला कोळी समाजाचे साम्राज होते.कोळी नागरिक हे मूळ मुंबईचेच आहेत.गिरगाव चौपाटी येथे कित्येक कोळी कुटुंब वर्षानुवर्षे राहतआहे. पण आज याच कोळी कुटुंबियांना हलाखीचे दिवस बघावे लागत आहेत. मासेमारी हा त्याचा मूळ व्यवसाय असून प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे मासेमारीला वाईट वेळ आली आहे.
त्यामुळे मनसेनं आपल्या पत्रात असे म्हंटलं आहे की, गिरगाव चौपाटीवर वर्षानुवर्षे खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवले जातात. येथे भेळपुरीचे स्टॉल उभे आहेत. याच धर्तीवर तिथल्या स्थानिक कोळी बांधवांसाठी मांसाहारी पदार्थाच्या विक्रीसाठी स्टॉल बांधून देण्यात यावेत. जेणेकरून मासे, चिकन, मटन यांचे वेगवेगळे पदार्थ तयार करून त्या जागेवर लोकांना खाण्यासाठी उपलब्ध करून देता येतील. या माध्यमातून कोळी बांधवांची देखील उपजीविका चालू शकेल.
आज गिरगाव चौपाटीवर देशभरातून पर्यटक येतात.याठिकाणी अनेक शाकाहारी पदार्थ उपलब्ध आहे.त्यामुळे मांसाहारी पर्यटकांची प्रचंड गैरसोय होते. या सर्व परिस्थितीचा विचार करता गिरगाव चौपाटीवर कोळी बांधवांना महापालिकेतर्फे मांसाहारी तयार खाण्याचे पदार्थ विक्रीसाठी स्टॉल बांधून देण्यात यावेत. कृपया आमच्या विनंतीचा सकारात्मक विचार करून सहकार्य करावे, ही नम्र विनंती, असं पत्र मनसेच्या वतीने लिहण्यात आलं आहे.
गिरगावमध्ये कोळी बांधवांच्या बोटी हटवण्याचे प्रयत्न
मुंबईतील गिरगाव चौपाटी परिसरात प्रशासनाच्या निर्णयाविरोधात कोळी बांधव आक्रमक झाल्याचे दिसून आले. गिरगावमधील समृद्ध परंपरा जपणाऱ्या कोळी समाजाच्या बोटी हटवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात असल्याचा समोर आले आहे. या निर्णयाला कोळी बांधवांकडून तीव्र विरोध दर्शवण्यात येत आहे. “आम्ही इथून जाणार कुठे?” असा थेट सवाल ते उपस्थित करत आहेत. वर्षानुवर्षे या परिसरात वास्तव्यास असलेल्या कुटुंबांनी आपला हक्क आणि उपजीविकेचा प्रश्न पुढे आणत आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
MNS steps in for the Koli community in Girgaon; writes directly to the Assistant Commissioner.
महत्वाच्या बातम्या