विशेष प्रतिनिधी
मुंबई : CM Devendra Fadnavis राज्यात 28 तारखेला होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) पेपर फोडणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा भिवंडी पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी कोनगाव पोलिसांनी धडक कारवाई करत तीन आरोपींना रंगेहाथ पकडत अटक केली. यानंतर आता राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याचे सह पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष तपास पथक (SIT) गठित करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.CM Devendra Fadnavis
टीईटी परीक्षेच्या आदल्याच दिवशी म्हणजे 27 जून रोजी पेपर फुटीचे प्रकरण बाहेर आल्याने 28 जून रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. अशामध्ये प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठांच्या आदेशाने एसआयटीची गठित करण्यात आली. या पथकाचे प्रमुख म्हणून पोलीस उपायुक्त पवन बनसोड काम पाहणार आहे. त्यांच्या पथकामध्ये 2 सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP), 9 अधिकारी ज्याच्यामध्ये पोलिस निरीक्षक (PI), सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI) तसेच 20 पोलीस कर्मचारी असणार आहेत. या रॅकेटच्या मुळाशी जाऊन शोध घेण्यासाठी पोलिसांची अनेक पथके वेगवेगळ्या राज्यांमध्ये रवाना झाली आहेत. यावेळी, पेपर दिल्लीमधून कसा आला? यामध्ये शिक्षण विभागातील कोणाचा सहभाग आहे का? तसेच हे पेपर आणखी कोणाला विकले गेले? या सर्व बाबींचा पोलीस आता सखोल तपास करणार आहेत.CM Devendra Fadnavis
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत 28 जून रोजी राज्यात एकूण 1028 केंद्रावर टीईटी 2026 घेण्याचे प्रस्तावित होते. नीट परीक्षेवेळेस झालेला गोंधळ पाहता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केल्या होत्या. मात्र, तरीही 27 जून रोजी पहाटे गोपनिय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही व्यक्तींकडे प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलिसांनी सादर ठिकाणी छापे टाकले. आरोपींची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे 28 जून रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे 4 सेट आढळून आले. पोलिसांनी तात्काळ शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हे पेपर पडताळून पाहिले. शिक्षण विभागाने त्यांच्या कार्यपद्धतीनुसार खात्री करत जप्त करण्यात आलेले हेच मूळ पेपर असल्याचे स्पष्ट केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या पेपर विक्रीसाठी आरोपींनी तब्बल 1.5 कोटी रुपयांची आगाऊ मागणी केली होती. हे पेपर पुढे विविध रकमांमध्ये परीक्षार्थी उमेदवारांना विकले जाणार होते. आरोपींकडून प्रश्नपत्रिकेचे 4 सेट, मोबाईल फोन, डेबिट आणि क्रेडिट कार्ड जप्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी परराज्यातील आहेत. यातील एक आरोपी हरियाणाचा तर दोन आरोपी बिहार राज्यातील आहेत. हे तिघेही दिल्लीवरून पेपर घेऊन भिवंडीत आले होते.
TET paper leak: CM Devendra Fadnavis announces Special Investigation Team
महत्वाच्या बातम्या
- केतन अग्रवाल हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात; विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती
- राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचा अखेर राजीनामा
- सुशिक्षित मुलांमध्ये सूडबुध्दी का निर्माण हाेतेय? केतन अग्रवाल प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचे भाष्य
- केतनला टक्कल असल्याने सियाला नव्हता पसंद, पाेलीस चाैकशीत कबुली