Uddhav Thackeray : ‘हे ऑपरेशन टायगर नाही, ऑपरेशन देवेंद्र’; परभणीत उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी

परभणी : Uddhav Thackeray मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी परभणीत पत्रकार परिषद घेत राज्य सरकार, भाजप आणि पक्षातून गेलेल्या खासदारांवर जोरदार टीका केली. “हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन देवेंद्र आहे,” असा आरोप करत त्यांनी पक्षांतर केलेल्या खासदारांना गद्दार संबोधलेUddhav Thackeray

परभणीच्या मतदारांनी महाविकास आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला खासदार म्हणून निवडून दिले होते. मात्र, निवडून आल्यानंतर त्यांनी गद्दारी केली. त्यामुळे मी परभणीकरांची माफी मागण्यासाठी आलो आहे. त्याचबरोबर महापालिकेवर आमची सत्ता आणणाऱ्या मतदारांचे आभार मानण्यासाठीही आलो असल्याचे ठाकरे म्हणालUddhav Thackeray



परभणीला अनेक वर्षांपासून फुटी आणि गद्दारीची पार्श्वभूमी आहे. मात्र, येथील मतदार कायम शिवसेनेसोबत ठामपणे उभे राहिले, याचा आम्हाला अभिमान आहे. गद्दारीच्या मुळावर घाव घातल्याशिवाय महाराष्ट्र आणि देश वाचणार नाही,” असेही त्यांनी नमूद केले.

खासदारांच्या पक्षांतरावर बोलताना ठाकरे म्हणाले, “या मतदारसंघांवर वेळेवर लक्ष दिले असते तर गद्दारांच्या हालचाली आधीच समजल्या असत्या. आमच्यासोबत राहण्याची शपथ घेऊन ती मोडणाऱ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. खासगी निधीसाठी ते सत्ताधाऱ्यांकडे गेले. त्यांनी खासदार निधी कुठे खर्च केला, लोकसभेत किती वेळा हजेरी लावली आणि विकासकामांसाठी मंत्र्यांना किती वेळा भेटले, याचा संपूर्ण अहवाल आमच्याकडे आहे.”

राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर टीका करताना त्यांनी पेपरफुटीच्या घटनांचाही उल्लेख केला. “नीटचा पेपर फुटला, आता टीईटीचाही पेपर फुटला. तिकडे खासदार फोडले जात आहेत. सगळीकडे फक्त फुटाफुटी सुरू आहे. जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती याकडे सरकारचे लक्षच नाही,” असा आरोप त्यांनी केला.

राम मंदिराच्या मुद्द्यावरही त्यांनी भाजपवर निशाणा साधला. “राम मंदिर उभारावे ही सर्व हिंदूंची इच्छा होती. पण भाजपने रामाच्या नावावर दुकान उघडले आहे. कारसेवकांचा संघर्षही विसरला गेला. मंदिरातील चोरी ही हिंदुत्वाशीच गद्दारी आहे,” असे ठाकरे म्हणाले.

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाचा उल्लेख केला. “आम्ही कर्जमुक्तीची घोषणा केली होती, तर या सरकारने जाचक अटींसह केवळ कर्जमाफी जाहीर केली. कर्जमुक्ती आणि कर्जमाफी यामधील फरक सरकारच्या धोरणातून स्पष्ट दिसतो. ही कर्जमाफी म्हणजे केवळ दिखावा आहे,” असा आरोप त्यांनी केला.

यावेळी खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महापौर सय्यद इक्बाल यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

‘This isn’t Operation Tiger, it’s Operation Devendra’: Uddhav Thackeray launches blistering attack in Parbhani

महत्वाच्या बातम्या