विशेष प्रतिनिधी
परभणी: उद्धव ठाकरे लक्ष देत नाही, असा आरोप केला जातो. मी लक्ष दिले नाही ही माझी चूक झाली. लक्ष दिले असते, तर आधीच तुमच्या भानगडी कळल्या असत्या. जनतेने यांना प्रेम दिले त्यामुळे ते माजले. ज्यांना प्रेम परवडत नाही, ते गद्दार होतात, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांवर केला. Uddhav Thackeray
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या फुटीर खासदारांच्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी यवतमाळ, वाशिम आणि हिंगोलीत दौरा केल्यानंतर, आज ते परभणी येथे पोहोचले आहेत. उद्धव सेनेतून शिंदेसेनेत गेलेले परभणीचे खासदार बंडू जाधव यांच्या मतदारसंघात ठाकरेंनी सभा घेतली.
उद्धव ठाकरे म्हणाले, कालपासून घेत असलेल्या सभा या मुळात सभा नाहीयेत. या माझ्या शिवसैनिकांसोबतच्या कौटुंबिक भेटी आहेत. त्या सभेसारख्या होत आहेत. येथे आलेले सर्व लोक शिवसेना प्रमुखांनी मला दिलेले जीवाभावाचे सोबती आहेत. इथे खुर्च्यांशिवाय कोणती गोष्टी भाड्याने आणली असेल, असे मला वाटत नाही. खुर्च्यांवर बसलेली सगळी आपली हक्काची माणसे आहेत. माजून माजून किती माजशील? एक शब्द पुरेसा आहे. तुझे सगळे कोलमडून पडते,.
आज बऱ्याच दिवसांनंतर परभणीत आलोय. आपल्या हक्काचा शिवसेनेचा महापौर निवडून दिल्याबद्दल मी परभणीकरांचे आभार मानतो. जनतेची सेवा करणारा एक कार्यकर्ता निवडून दिलात. त्यावरूनही माझ्यावर टीका झाली. बाळासाहेबांचे विचार सोडले म्हटले. का म्हटले तर महापौर मुसलमान आहे. असेल, पण तो आमचा आहे. तो शिवसेनेची उमेदवारी घेऊन शिवसैनिक म्हणून लढलेला आहे. ज्यांनी माझ्यावर टीका केली, त्या गधड्यांना विचारायचे आहे की, तुम्ही कालच्या विधान परिषेत जो आमच्या नावंदरच्या विरोधात निवडून आणला, तो कोण आहे? त्यांनी निवडून दिलेल्या आमदाराची पार्श्वभूमी काढा. त्याच्यावर काही खटले होते ते काढा. आणि महाराजांच्या कीर्तनासाठी पीक काढून स्वत:ची जमीन उपलब्ध करून देणार आमचा महापौर बघा, असे कौतुक उद्धव ठाकरे यांनी केले.
उद्धव ठाकरे म्हणाले, मला पत्रकारांनी विचारले विकासनिधी? पण कोणाचा? मतदारसंघाच्या विकासासाठी की स्वत:च्या खासगी विकासासाठी? कारण एक व्हिडिओ फिरतोय. हे महाशय विमानात बसलेत. बदाम वैगेरे खात आहेत. शेतकरी बिचारा असाच उपाशी आहे. पण हे विकास करणारे लगेच प्रायव्हेट विमानात. कुणी दिला पैसा? त्या व्हिडिओत खरेदी-विक्री करणारा दलाल सुद्धा दिसतोय. कुठून आणला हा पैसा? माझ्यावर टीका करताता की, उद्धव ठाकरेने आत्मपरीक्षण केले पाहिजे. पण हे आत्मपरीक्षण सगळ्यांनी केले पाहिजे. टीकाकारांनी देखील आत्मपरीक्षण केले पाहिजे. आमच्या पक्ष फुटीचे केस चार वर्षांपासून सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. का आत्मपरीक्षण केले जात नाही.
उद्धव ठाकरे म्हणाले, हा माझा पक्ष इथून निवडून देतो, तेव्हा ते तिकडे जाऊन बसतात. तिकडे जाऊन बसणारे म्हणजे पक्ष नाही. ते आमचे लोकप्रतिनिधी आहेत. लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष नव्हे. जनता, मतदार म्हणजे पक्ष आहे. दोन तृतीयांश सभासद जे असतात, ते जर इकडून तिकडे गेले आणि दुसऱ्या पक्षात विलीन झाले, तर त्याला कायदेशील मान्यता मिळू शकते का? तर नाही, असे कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी म्हटले आहे. जर या देशात कायद्याचे राज्य असेल, तर ते सहा गद्दार बाद झाले पाहिजेत. मला लोकसभा अध्यक्षांवर विश्वास आहे. शेवटी त्यांनी कायदा पाळला नाही, तर जनतेला सांगू शकणार नाही की कायदा पाळा म्हणून. जे घटनेत दिलेले आहे, त्याचे उल्लंघन तुमच्यासारख्या जबाबदार पदावर बसलेल्या व्यक्तीने करता कामा नये. नाहीतर इतिहासात घटना तोडणारे अध्यक्ष म्हणून तुमची नोंद होऊ देऊ नका, असा विनंती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिला.
उद्धव ठाकरे म्हणाले, “जेव्हा मी शेतकऱ्यांसाठी दौरा काढला होता, तेव्हा आमदार राहुल पाटील माझ्यासोबत होते. हा गद्दार मात्र दौऱ्याला नव्हता, कुठेच हा गद्दार दिसला नाही. आता म्हणतो की उद्धव ठाकरेंनी लक्ष दिले नाही. अगदी बरोबर आहे. जर लक्ष दिले असते, तर तुमच्या भानगडी आम्हाला कधीच कळल्या असत्या. लक्ष दिले नाही ही माझाी चूक झाली. लक्ष द्यायला पाहिजेच होते. पण आता यापुढे शिवसैनिकांनी लक्ष द्यायचे आहेत. तुम्ही आतापर्यंत जे प्रेम दिलेत, त्या प्रेमामुळे हे माजलेत. प्रेम ज्यांना परवडत नाही, ते गद्दारी करतात. आज आमचे तीन खासदार आणि राज्यसभेत एक खासदार आहे. आमचे हे चार जण पुरेसे आहेत.
Uddhav Thackeray targets rebel MPs
महत्वाच्या बातम्या
- केतन अग्रवाल हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात; विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती
- राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचा अखेर राजीनामा
- सुशिक्षित मुलांमध्ये सूडबुध्दी का निर्माण हाेतेय? केतन अग्रवाल प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचे भाष्य
- केतनला टक्कल असल्याने सियाला नव्हता पसंद, पाेलीस चाैकशीत कबुली