Pravin Darekar : देवाभाऊ सहकार टॅक्सी उपक्रमाला ‘नमो सहकारी टॅक्सी’ नाव देणार, प्रवीण दरेकर यांची माहिती

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Pravin Darekar राज्यात नव्याने सुरू करण्यात येत असलेल्या देवाभाऊ सहकार टॅक्सी योजनेबाबत सुरू असलेल्या आरोपांवरून भाजपा गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या उपक्रमाला ‘नमो सहकारी टॅक्सी’ हे नाव देणार असून ‘नमो सहकारी टॅक्सी’ योजना ही चालकांच्या हितासाठी आहे. यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही. माघार घेण्यास बोलले तर घेईन, मात्र खासगी कंपन्यांमुळे चालकांच्या होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? असा खडा सवालही यावेळी दरेकरांनी उपस्थित केला.Pravin Darekar

पत्रकार परिषदेत देवदत्त सहकारी संस्थेची वस्तुस्थिती मांडताना दरेकर म्हणाले की, देवदत्त सहकारी संस्था ही वाहतूक व पर्यटन क्षेत्रात काम करण्यासाठी स्थापन झाली होती. या संस्थेची रीतर नोंदणी झाली असून त्याचे प्रमाणपत्रही आहे. राज्यातील बेरोजगार तरुणांना वाहतूक व पर्यटन क्षेत्रात सहकाराच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होऊ देणे हा प्रमुख उद्देश आहे. परंतु काही कारणास्तव ही संस्था मृतावस्थेत होती. हे समजल्यानंतर ती संस्था पुनर्जीवित करण्याचा मी प्रयत्न केला. या संस्थेच्या माध्यमातून टॅक्सी सेवा हा उपक्रम वाहतूकशी संबंधित असल्याने सुरू करण्याचा विचार केला. हा उपक्रम झाला तर पहिल्या टप्प्यात 3 हजार टॅक्सी रस्त्यावर आणल्या, तर प्रत्येकी 2 हजार विशेषतः मराठी तरुण व 50 टक्के महिला चालकांना रोजगार मिळणार आहे.Pravin Darekar



ओला, उबर, रॅपिडो या खाजगी कंपन्या आहेत. त्यांच्या माध्यमातून चालकांचे रक्त शोषले जाते. देवाभाऊ टॅक्सी नावावर कुणाचा आक्षेप असेल तर तेही बदलू. उलट मुख्यमंत्री यांनी नमो टॅक्सी हे नाव सुचवले आहे. यामुळे ज्या चालकांना यात सहभागी करणार आहोत ते स्वतः भागीदार बनणार आहेत. संस्थेचे ते शेअर होल्डर बनणार आहेत. जो नफा कमवला जाईल, त्याचे शेअरिंग चालकांना जाणार आहे. कुठल्याही बँकेचे कर्ज घेणे हे धोरण असते. मुंबई बँकेत गाडी घेण्यासाठी कर्ज देण्याची पॉलिसी अनेक वर्ष आहे. आता फक्त त्या संस्थेच्या माध्यमातून जावे कारण संस्थेला रेट ऑफ इंटरेस्ट कमी असतो, असा स्पष्ट उद्देश आहे. तसेच देवदत्त सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली असून त्याचे पुरावेही माझ्याकडे असल्याचे सांगितले.

Namo Sahakari Taxi’ Name Proposed for Devabhau Cooperative Taxi Scheme, Says Pravin Darekar

महत्वाच्या बातम्या