CM Devendra Fadnavis : ‘पुढील पिढ्यांना दुष्काळ पाहू देणार नाही’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

विशेष प्रतिनिधी

मुंबई: CM Devendra Fadnavis राज्यातील शेती अधिक सक्षम, शाश्वत आणि फायदेशीर करण्यासाठी जलसंधारण, सौर कृषी पंप, दिवसा मोफत वीज, कृषी यांत्रिकीकरण, सिंचन सुविधा आणि शेतकऱ्यांना आर्थिक बळ देणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, “महाराष्ट्राच्या पुढील पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही,” असा ठाम निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.CM Devendra Fadnavis

वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये कृषी विभागातर्फे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह तसेच राज्यातील कृषी पुरस्कार विजेते उपस्थित होते.CM Devendra Fadnavis



मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘जलयुक्त शिवार अभियान’ आणि शेततळे योजनेच्या माध्यमातून राज्यातील २२ हजारांहून अधिक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. यामुळे दुष्काळाच्या समस्येवर दीर्घकालीन उपाययोजना करण्यास मदत होत आहे.

ते म्हणाले की, राज्य सरकारचा शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज देण्याचा निर्णय प्रभावीपणे राबविला जात आहे. सध्या ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होत असून, चालू वर्षाअखेर सर्व शेतकऱ्यांना १२ तास मोफत दिवसा वीज देण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी राज्य शासन दरवर्षी सुमारे २८ हजार कोटी रुपये खर्च करत आहे.

फडणवीस यांनी सांगितले की, प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत देशभरात बसविण्यात आलेल्या सौर कृषी पंपांपैकी तब्बल ६० टक्के पंप महाराष्ट्रात बसविण्यात आले असून, या क्षेत्रात राज्य देशात आघाडीवर आहे.

कृषी यांत्रिकीकरणासाठी राज्य सरकार दरवर्षी १,५०० ते २,००० कोटी रुपयांची तरतूद करत असून, कृषी अवजारांवर ८० ते १०० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

महिला शेतकऱ्यांना कायदेशीर शेतकरी दर्जा देणारे विधेयक सादर करण्यात आल्याचे सांगत त्यांनी *जिजामाता कृषी भूषण पुरस्कारच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या योगदानाचा गौरव होत असल्याचे नमूद केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, कृषी क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. यासाठी अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, बारामती येथे उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्रातून शेतीसाठी आधुनिक आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाणे आणि जलसंधारणाचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले. कृषी विभाग, संशोधन संस्था, कृषी विद्यापीठे आणि शेतकरी यांच्या समन्वयातून महाराष्ट्रातील शेती अधिक आधुनिक, शाश्वत आणि स्पर्धात्मक बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘Won’t Let Future Generations Face Drought’: CM Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या