विशेष प्रतिनिधी
मुंबई:Nitesh Rane आमिर खानचा तिसरा विवाह सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला. अशा काही गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा या लोकांकडे ‘लव्ह जिहाद’चा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून पाहायचे का? ही चर्चा हळूहळू वाढत चालली आहे. हिंदू समाज बांधवांनी सावधान रहावे, असे ‘लव्ह जिहाद’चा ब्रँड ॲम्बेसेडर कुठेही दिसले तर यांचे चित्रपट पाहायचे का हे देखील ठरवायला हवे, असे असा निशाणा भाजपचे नेते आणि मंत्री नीतेश राणे यांनी साधला आहे.Nitesh Rane
आमिर खान यांच्या कथित तिसऱ्या विवाहाचा उल्लेख करत राणे म्हणाले की, अशा घटना घडतात तेव्हा संबंधित व्यक्तींना ‘लव्ह जिहाद’चा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून पाहिले जाऊ लागते. अशा व्यक्तींचे चित्रपट पाहायचे की नाही, याचा विचार हिंदू समाजाने करावा, असेही त्यांनी म्हटले.Nitesh Rane
हिंदू धर्मावरील टीकेच्या संदर्भात बोलताना राणे यांनी काही व्यक्तींवर हिंदू धर्माला लक्ष्य करण्याचा आरोप केला. मशिदी, हज यात्रा किंवा इतर धार्मिक विषयांवरील कथित गैरप्रकारांवर हेच लोक मौन बाळगतात, मात्र हिंदू धर्मावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत, असा आरोप त्यांनी केला. पश्चिम बंगालमधील एका मशिदीशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहाराचाही त्यांनी उल्लेख केला.
‘फडणवीस हेच शेतकऱ्यांचे खरे तारणहार’
शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत राणे म्हणाले की, कर्जमाफीतील जाचक अटी हटवून राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. अनेक नेत्यांना जे साध्य झाले नाही, ते फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून करून दाखवले असून तेच शेतकऱ्यांचे खरे तारणहार असल्याचे त्यांनी म्हटले.
संजय राऊतांवरही टीका
संजय राऊत यांच्यावर टीका करताना राणे म्हणाले की, त्यांच्या पक्षाची स्थिती इतकी कमकुवत झाली आहे की, त्यांच्या पक्षाचे नेते आता सरपंचही होऊ शकणार नाहीत. पक्षातील पदाधिकारी, आमदार आणि खासदार पक्ष सोडत असल्याचा दावा करत त्यांनी राऊत यांच्यावर पक्षांतर्गत वाद निर्माण करण्याचा आरोप केला. भाजपमध्येही मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न राऊत करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
यंदाच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत, साईबाबांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आशीर्वाद द्यावेत, अशी प्रार्थना आपण केल्याचेही नीतेश राणे यांनी सांगितले.
Aamir Khan branded ‘Love Jihad’ ambassador by Nitesh Rane
महत्वाच्या बातम्या
- मोशी दुर्घटना प्रकरणात हलगर्जीपणा, महापालिका आयुक्तांना निलंबित करा : सुषमा अंधारे यांची मागणी
- Vijaya Rahatkar : उझबेकिस्तानातील वैद्यकीय विद्यार्थिनीच्या मृत्यूची राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली स्वतःहून दखल
- भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला; कोयताधारी हल्लेखोर फरार
- Sassoon Hospital : ससून रुग्णालयात धार्मिक प्रचार करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा