Navneet Rana : ‘शेरनी शांत आहे, पण डरकाळी फोडणं विसरत नाही’; नवनीत राणांचा विरोधकांना इशारा

विशेष प्रतिनिधी

अमरावती: Navneet Rana लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रथमच आक्रमक भूमिका घेत भाजप नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. अमरावतीतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली.Navneet Rana

“माजी खासदार झाल्याची वेदना मनात आहे. मात्र मी शांत बसले आहे, असा कोणी समज करून घेऊ नये. ‘शेरनी अगर शांत है तो डरकाळी फोडणं कधीच सोडत नाही’, हे विरोधकांनी लक्षात ठेवावे,” असा इशारा नवनीत राणा यांनी दिला.राज्यसभेच्या चर्चांवर भाष्य करताना त्यांनी, “मी राज्यसभेसाठी कधीही कोणाच्या दारात गेले नाही. स्वाभिमान जपत ती संधी मी स्वतःहून सोडली,” असा दावा केला.Navneet Rana



यावेळी त्यांनी हनुमान चालीसा आंदोलनाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. मुख्यमंत्री असताना १४ दिवस तुरुंगात टाकल्याची आठवण करून देत, “सगळं बरबाद झाल्यावरच त्यांना राम आणि हनुमान चालीसा आठवली,” असा टोला त्यांनी लगावला.

स्थानिक विकासाच्या मुद्द्यावर बोलताना नवनीत राणा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास व्यक्त करत, आमदार रवी राणा यांच्या मतदारसंघातील विकासकामांना त्यांचे पूर्ण सहकार्य राहील, असा विश्वास व्यक्त केला.

‘A Lioness May Stay Quiet, But Never Forgets to Roar’: Navneet Rana Warns Rivals

महत्वाच्या बातम्या