विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर :- kohlapur news अवघ्या एका महिन्याच्या मुलीच्या बारशाची तयारी सुरु असताना आईने राहत्या घरी छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अस्मिता प्रतीकसिंह काटकर ( वय २१, रा. राजारामपुरी, कोल्हापूर) असे मृत महिलेचे नाव आहे.
रविवारी सायंकाळी घडलेल्या घटनेने कुटुंबीयासह नातेवाईकांना धक्का बसला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.कोल्हापूर येथील राजारामपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा घटनेची नोंद झाली आहे. पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी केली. लाटगाव येथील अस्मिता हिचा वर्षापूर्वी सायबर चौक येथील प्रतीकसिंह काटकर यांच्याशी विवाह झाला. महिन्यापूर्वी अस्मिता यांची प्रसूत झाली. दोन दिवसांत मुलीला एक महिना होत असल्याने घरात मुलीच्या बारशाची तयारी सुरू होती.
नेमका घडला काय ?
रविवारी दुपारी सासू, सासरे व पती बारशाच्या कार्यक्रमासाठी हॉल ठरविण्यासाठी गेले होते. यावेळी घराचा मुख्य दरवाजा बंद करून अस्मिताने बेडरूममधील छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेतला. काहीवेळाने पतीसह सासू-सासरे घराकडे परतले. दरवाजा आतून बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी हाका मारल्या, मोबाईलवर कॉल केला.घरातून प्रतिसाद मिळेना. अखेर त्यांनी दरवाजा तोडून प्रवेश केला असता, अस्मिताने गळफास घेऊन जीवन संपवल्याचे निदर्शनास आले. गळफास सोडवून तिला शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शेंडा पार्कात हलविण्यात आला. रात्री उशिरापर्यंत कारण अस्पष्ट होते. kolhapur news
The mother ended her life on the very day of her daughter’s naming ceremony!
महत्वाच्या बातम्या