कंडक्टरची अरेरावी! सुट्टे पैसे नाही म्हणताच थेट परिवहन मंत्र्यांनाच उतरवलं

विशेष प्रतिनिधी

कर्नाटक :-बस प्रवासात सुट्ट्या पैशांवरून वाद आणि भांडणाचे प्रकार अनेकदा घडत असतात. याचा त्रास अनेकदा प्रवाशांना सहन करावा लागतो. पण आता याच कारणामुळे थेट कर्नाटकच्या परिवहन मंत्र्यांनाच Transport Minister चालत्या बसमधून खाली उतरवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून संबंधित बस चालक आणि कंडक्टरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.



मंत्री बायराथी सुरेश यांनी हेब्बल ते नागशेट्टीहल्लीपर्यंत बीएमटीसी बसने प्रवास केला. ते बसमध्ये चढले. त्यानंतर त्यांनी दोन तिकीटे मागितली. त्यांनी बस कंडक्टरकडे 100 रुपयांची नोट दिली. परंतु कंटक्टरने त्यांच्याकडे सुट्टे पैसे मागितले. मंत्र्याने सुट्टे पैसे नसल्याचे सांगितले. त्यानंतर कंडक्टरने मंत्र्याला बसमधून उतरण्यास सांगितले. तोंडाला मास्क घातलेल्या मंत्री सुरेश यांनी बसमध्ये कोणीही ओळखलं नाही. ते कंटक्टरला काहीच न बोलता बसमधून उतरले. त्यानंतर पुढील काही वेळेत बस चालक आणि कंडक्टर निलंबित झाले.

दोन तासांत १० पेक्षा अधिक बसमधून प्रवास

दरम्यान, मंत्री सुरेश यांना फक्त बस प्रवासातील मनस्तापाचाच अनुभव आला नाही, तर ऑटो-रिक्षा चालकांकडून होणाऱ्या अतिरिक्त वसुलीचाही अनुभव त्यांना आला . बसमधून खाली उतरवल्यानंतर त्यांनी नागशेट्टीहल्ली येथे एका ऑटो-रिक्षा चालक आणि प्रवाशामधील वादात हस्तक्षेप केला. त्या रिक्षाच्या मीटरवर ३० रुपये भाडे दिसत असतानाही देखील चालक प्रवाशाकडून ३६ रुपयांची मागणी करत होता. यावरून तो प्रवाशाशी हुज्जत घालत होता.मंत्री सुरेश यांनी जवळपास दोन तासांत १० पेक्षा अधिक बसमधून प्रवास केला आणि प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेतल्या. आता कर्मचाऱ्यांमध्ये अधिक शिस्त आणण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुखकर करण्यासाठी तपासण्यांसह आणखी कडक पावले उचलण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.

Conductor’s high-handedness! After claiming there was no change, he made the Transport Minister himself get off.

महत्वाच्या बातम्या