विशेष प्रतिनिधी
पुणे : राजीनामा देण्याच्या वृत्ताचा इन्कार करत श्री राम मंदिर ट्रस्ट अयोध्याचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी मी राजीनामा देणार आहे, असा विचारही माझ्या मनात नाही. ट्रस्ट सोबत उभे राहण्याची हीच वेळ असल्याचे स्पष्ट केले आहे. Govinddev Giri Maharaj
पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बाेलताना स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले, काल सगळीकडे माझ्या राजीनाम्याची बातमी पसरली होती. मी असं कधीही म्हटलं नाही. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा अनुयायी आहे. मैदान सोडून पळणारा नाही. माझ्या नावावर संपूर्ण जीवनात एकही विट नाही, काहीही संपत्ती माझ्या नावावर नाही. फक्त एक बँक अकाउंट आहे. कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा मी द्यावा असे मी कधी मनातही आणले नाही. अनेकांचे मला फोन आले. मी राजीनामा देणार आहे. असा विचारही माझ्या मनात नाही. ट्रस्ट सोबत उभे राहण्याची हीच वेळ आहे.
माझ्या राजीनाम्यासंदर्भात आलेल्या बातम्या खोट्या आहेत. त्या खोडसाळपणे पसरवल्या असल्याचे सांगताना स्वामी म्हणाले, संघर्षावेळी ट्रस्ट सोबत उभा राहणं महत्वाचं आहे. एसआयटीच्या चौकशीवर मी समाधानी आहे. चंपातराय यांनी जो राजीनामा दिला आहे, तो त्यांचा हलगर्जीपणामुळे दिलेला आहे, त्यांनी दिलेला राजीनामा हा स्व:च्छेने दिलेला आहे. जमाखर्चाची जबाबदारी मी स्वीकारत आहे. मी कुठं प्रभाव टाकत नाही. कुणाला ही फोन केलेला नाही. गुन्हेगार कुणीही असो, त्यांना पकडले पाहिजे आणि कठोर कारवाई केली पाहिजे.
स्वामी गाेविंदगिरी महाराज म्हणाले, एसबीआय बँकेने त्यांचे निरीक्षक ठेवायला हवे होते. त्यांनी शिस्त पाळायला हवी होती. सीसीटीव्ही च्या निगराणीत देणगीची रक्कम मोजली जायची. पण, बाजूला जाऊन ही रक्कम लंपास करण्यात आली. अव्वाच्या सव्वा आकडेवारी सांगितली जात आहे. 3 कोटींच्या आसपास रक्कम असावी, हा माझा अंदाज आहे. हिशोबाच्या तपासणी योग्यच सुरू आहे. चंपातराय यांनी अनिल मिश्रा यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. माझी यात भूमिका नाही. निधी चोरीचा राजकीय संबंध नाही, त्या केवळ गप्पा आहेत. एसआयटी चौकशी करत आहे, त्यामुळे त्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही.
“I will not resign”: Swami Govinddev Giri Maharaj denies resignation reports
महत्वाच्या बातम्या
- राज्यभरात भेसळखोरांवर अभूतपूर्व कारवाई; ३ दिवसांत ५३ धाडी, ३४ ठिकाणी कारवाई, तर ३३ जणांना बेड्या!!
- शिक्षा संस्कृति उत्थान न्यासाची राष्ट्रीय प्रांत संयोजक बैठक पुण्यात सुरू; राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, भारतीय ज्ञानपरंपरेवर मंथन
- Florida Test : जेफ बेझोस यांच्या ‘ब्लू ओरिजिन’ला मोठा धक्का; फ्लोरिडात चाचणीदरम्यान ‘न्यू ग्लेन’ रॉकेटचा भीषण स्फोट
- NIA : पाकिस्तानशी जोडलेल्या दहशतवादी जाळ्यावर NIAची मोठी कारवाई; राजस्थानसह ४ राज्यांत धाडसत्र