विशेष प्रतिनिधी
पुणे : Ajitdada भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी भाषणात अजित दादांचा उल्लेख टाळल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या.Ajitdada
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्तालय मंजूर केले, सुरू केले आणि आज भव्य इमारतीचे भूमिपूजन केले असे आमदार महेश लांडगे म्हणाले. त्यांनी अजित पवार यांचे नावही घेतले नाही.
यामुळे अजित पवार यांना चागलाच राग आला. त्यानंतर अजित पवार यांनी बोलताना, महेशला माझं नाव घ्यायला काय वाईट वाटले मला माहित नाही. आपण महायुतीत आहोत, चांगल्याला चांगलं म्हणायला शिका.. मी १९९२ मध्ये या ठिकाणचा खासदार झाल्यापासूनच २०१७ पर्यंत शहरासाठी काय काय केले हे सर्व शहवासीयांना माहीत आहे, असे अजित दादा म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्षच अजित पवार यांनी महेश लांडगे यांना कानपिचक्या दिल्याने महेश लांडगे चांगलेच खजील झाले होते.
Ajitdada was angry with Mahesh Landge and said, “Why did you think it was bad to take my name?
महत्वाच्या बातम्या
- अंजली दमानिया यांच्यावर धनंजय मुंडे दाखल करणार फौजदारी अब्रुनुकसानीचा खटला
- पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात, दिल्लीत आज मतदान
- Anjali Damania : अंजली दमानिया यांनी वाचला धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराचा पाढा, कृषीमंत्री असताना दुपटीहून दराने खरेदी
- Supriya Sule : पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्र्यांचे आश्वासन