Pankaja Munde’ : परीक्षा पे चर्चावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधानांनी विध्यार्थ्यांना दिला जीवनमंत्र

विशेष 

बीड : Pankaja Munde मी गुंडाला गुंड आहे, बंडाला बंड आहे, कोणाला घाबरत नाही. गोपीनाथ मुंडेची लेख कुणाची मिंधी नाही.ज्या दिवशी लोक नाही म्हणतील त्या दिवशी तुमची ताई स्वाभिमानाने घरच्या गादीवर बसेल, असा सूचक इशारा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिला आहे. मुंडे यांचा इशारा कोणाला यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे Pankaja Munde

बीडच्या पाटोदा येथील संत मीराबाई संस्थानावर अखंड हरिनाम सप्ताह गत सात दिवसापासून सुरू असून या सप्ताहाची सांगता प्रसंगी मुंडे बोलत होत्या.
त्या. म्हणाल्या, माझ्या बापाने दुःख भोगलेय त्या कष्टाबद्दल मला आदर आहे. माझ्या कर्मभूमीकडे माझे बारीक लक्ष असते, असे म्हणत तुम्ही करत असलेल्या प्रेमाची किंमत कशातच मोजू शकत नाही.



मुंडे साहेब असताना ते इथे कार्यक्रमाला येत होते. गडावर का जातात हे माहित नाही. पण मी लोक आपले असतात म्हणून येत असते. राजकारणात काम करणाऱ्या माणसाने धर्मात हस्तक्षेप करू नये आणि धर्मात काम करणाऱ्या माणसाने राजकारणात हस्तक्षेप करू नये. काही जणांना स्वतःचे स्वागत स्वतःच करून घ्यायची सवय असते,’ अशी टीका त्यांनी यावेळी केली.

लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर खूप जणांचे प्रेम वाढले. मंत्री झाले काय आणि नाही झाले काय मला काही फरक पडत नाही आधीच मला तुमचे प्रेम मिळते आहे. त्या प्रेमाच्या बदलात मी तुम्हाला विकास आणि न्याय देऊ शकते. बीड माझंच आहे मला आता आष्टीत जास्त प्रेम करावे लागेल, असे म्हणत गोपीनाथ मुंडेची लेख कुणाची मिंधी नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले

I don’t fear any one, Pankaja Munde’s Pointed Warning

महत्वाच्या बातम्या